कोल्हापूर : फोंडा घाटात टँकर चालकाचा खून | पुढारी

कोल्हापूर : फोंडा घाटात टँकर चालकाचा खून

राशिवडे (कोल्हापूर) : पुढारी वृतसेवा

राधानगरी ते फोंडा घाटदरम्यान असणाऱ्या शेळप बाबरजवळ एका टँक़र चालकाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. तरलोकसिंग धरमसिंग (वय ५४) असे मृताचे नाव असून ट्रँकरच्या केबीनमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे. मृत टँकर चालक हा पंजाब राज्यातील आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राधानगरी फोंडा राज्यमार्ग १७८ वर शेळप बांबर दरम्यान रस्त्याच्या बाजूला पार्क करण्यात आलेलेल्या टँकर क्र. पीबी ०६ बीए ७६२६ च्या केबीनमध्ये तरलोकसिंग धरमसिंग या चालकाचा मृतदेह आढळून आला. तपास केला असता मृतदेहाच्या डोक्यावर, कानामागे वार झाल्याचे दिसून आले. दोन अज्ञातानी हा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. राधानगरी येथील एका ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून लवकरच आरोपींना अटक केले जाईल, असे राधानगरी पोलिसांनी सांगितले. याबाबतचा अधिक तपास राधानगरी ठाण्याचे पोलिस निरिक्षक आप्पासो कोळी, उपनिरीक्षक नजीरखान, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुरेश मेटील, कृष्णा यादव आदी करत आहेत.

Back to top button