यूपीत राणी पक्षालिका सिंह पहिल्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार | पुढारी

यूपीत राणी पक्षालिका सिंह पहिल्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार

आग्रा :

भदावर येथील राणी पक्षालिका सिंह या यूपीत पहिल्या टप्प्यातील मतदानातील सर्वात श्रीमंत महिला उमेदवार आहेत. त्या भाजपच्या उमेदवार असून त्यांच्याकडे एकूण 58 कोटी स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. 61 वर्षीय पक्षालिका यांच्याकडे 132 शस्त्रास्त्रे आहेत. यात दोन बंदूकी, एक रायफलही आहे. 2017 च्या निवडणुकीतही त्या सर्वात श्रीमंत महिला उमेदवार होत्या. बिहड की राणी नावाने त्या प्रसिद्ध आहेत. पूर्वी त्या सपामध्ये होत्या. 2012 मध्ये त्या सपाकडून लढल्यावर पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आणि त्यांचे पती राजा महेंद्र अरिदमन सिंह यांनी भाजपत प्रवेश केला होता.

 

Back to top button