ऐकावं ते नवलच! मुख्याध्यापकानं चावला शिक्षकाचा अंगठा, जेवण दिलं नाही म्हणून केलं कृत्य, प्रकरण गेलं पोलिसात | पुढारी

ऐकावं ते नवलच! मुख्याध्यापकानं चावला शिक्षकाचा अंगठा, जेवण दिलं नाही म्हणून केलं कृत्य, प्रकरण गेलं पोलिसात

येवला; पुढारी वृत्तसेवा

कॅटलॉगमधील चुका माफ करण्याच्या बदल्यात जेवण दिले नाही म्हणून मुख्याध्यापकाने शिक्षकाचा अंगठा चावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्गाच्या कॅटलॉगमध्ये चुका आहेत त्या दुरुस्त करून दे. आम्हाला जेवण दे. त्याच प्रमाणे पगार बिलातील कपातीच्या संदर्भात झालेल्या वादातून मद्यधुंद मुख्याध्यापकांनी अंगठा चावल्याची फिर्याद ब्रम्हचैतण्य जालिंदर राजगुरू (वय 38, रा. येवला, विठ्ठल नगर, निलांबरी, ता. येवला, जि. नाशिक) या शिक्षकाने येवला शहर पोलीस ठाण्यांमध्ये केली आहे. शिक्षण क्षेत्रात अशी घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

येवला तालुक्यातील नगरसूल येथील शिक्षण प्रसारक मंडळ येथे उपशिक्षक म्हणून नोकरीस असलेले राजगुरू यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. सदर संस्थेत सुरेश एस अहिरे हे मुख्याध्यापक आहेत. फिर्यादी उपशिक्षक राजगुरू यांच्या पगारातील काही रक्कम कर्जासाठी पगारातून जात होती. यादरम्यान मुख्याध्यापक अहिरे पैशासाठी तगादा लावत होते. पण राजगुरु यांनी त्यास नकार दिला. यामुळे त्यांच्यात वाद झाला. मुख्याध्यापक अहिरे वेळोवेळी वेगळी कारणे सांगून पैसे घेत होते. पैसे घेऊनही ते धमकीवजा बोलायचे, असेही फिर्यादीमध्ये राजगुरू यांनी नमूद केले आहे.

फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, १२ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे राजगुरू शाळेत गेले असता त्यावेळी मुख्याध्यापक सुरेश अहिरे यांनी त्यांच्याकडून कॅटलॉग मागितला. त्यावर राजगुरू यांनी कॅटलाग घरी आहे असे उत्तर दिले. त्यानंतर मुख्याध्यापक अहिरे येवला शहरात पंचायत समिती येथे आले होते. त्यांनी त्यांचे सोबत असलेले मित्र आनंद कोळी याचे फोनवरुन संपर्क करीत राजगुरू यांना तहलीस कार्यालयात बोलविले. यावेळी शिक्षक राजगुरू पोहोचले असता त्यांना तहसील कार्यालयाच्या गेटमधून आत पार्किंग जवळ ये असे मुख्याध्यापकांनी सांगितले. सदर ठिकाणी राजगुरु गेले असते तेथे मुख्याध्यापक दारु पिलेल्या अवस्थेत होते. ते म्हणाले की, कॅटलॉग आणला का?. त्यांनी सदर कॅटलॉग पाहिला आणि त्यांनी त्यात चुका असल्याचे सांगितले. त्यावरुन त्यांनी, आम्हाला जेवण दे, अशी मागणी केली. राजगुरु यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांना त्यांचा डावा हात धरला आणि अंगठा तोडात धरुन जोरात चावला. यामुळे अंगठ्याला जखम होऊन तो रक्तबंबाळ झाला, असे राजगुरू यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : व्हिडिओ व्हायरल! माकडाच्या मृत्यूनंतर मुंडन अन्‌ तेराव्याला भोजन, १५०० लोकांची गर्दी |

Back to top button