मुंबई : पायधुनीमध्ये 18 लाखांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने असलेली बॅग तीन लुटारूंनी पुजारी असल्याची बतावणी करून लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली.
मुलुंडमध्ये राहत असलेल्या 32 वर्षीय तक्रारदार यांचा अब्दुल रेहमान स्ट्रिट येथे हिर्याचे दागिने घडविण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे 18 कामगार आहेत. सोन्याच्या दागिन्यावर हिरे चिटकविण्यासाठी हिर्यांना लेजर सोल्डर करावे लागते. हे काम ते पायधुनीमधील नाखुदा मोहल्ला येथून करून घेतात. 10 नोव्हेंबरच्या सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास तक्रारदार यांनी 18 वर्षीय कामगार कृष्णा मायती याच्याकडे 02 हजार 564 हिर्यांनी घडविलेला 17 लाख 85 हजार 200 रुपये किंमतीचा हार लेजर सोल्डर करण्यासाठी दिला होता. हिरेजडीत हार घेऊन जात असताना तीन अनोळखी व्यक्तींनी ही लूट केली.