पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सनसनाटी वक्तव्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल आहे की नाही? याची चर्चा सुरु झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले यांच्याकडून आघाडीमध्ये बिघाडी होईल अशी वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. पटोले यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
अधिक वाचा
मुख्यमंत्री आणि अजित पवार पाळत ठेवत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. गृहमंत्री आणि मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे आहे. त्यांना सगळे रिपोर्ट जातात. कुठे काय चालू आहे याचं सगळं अपडेट त्यांना द्यावे लागतात. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. हे त्यांना माहीत नाही का? अशी वक्तव्ये करत खळबळ उडवून दिली.
त्यांच्या वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संताप व्यक्त केला आहे. अशा आरोपांनी आघाडीला सुरुंग लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी सुद्धा नाना पटोले यांना टोला लगावत माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी माहितीच्या अभावाने अशा प्रकारचे आरोप केले आहेत. कोणतेही सरकार असले गृहखात्याकडून माहिती संकलित केली जाते. सुरक्षेच्या दृष्टीने दौऱ्यावर लक्ष असते. त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून माहिती घ्यावी.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मनगढंत कहाण्या रचून आघाडी सरकारमध्ये फूट पडण्याचा विरोधकांचा हा डाव सुरू आहे. काँग्रेस हा पक्ष दिवसेंदिवस लोकाभिमुख होत असल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे.
मीडियाचा आधार घेऊन तीनही पक्षात फुट पाडण्याच्या दृष्टीने भाजपा अफवा पसरवत आहे. विरोधकांचा हा डाव यशस्वी होणार नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजपवर पलटवार केला.
पटोले यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला भेटायला बोलावलं तर त्यांना भेटायला जाईल. गैरसमजावर त्यांच्याशी चर्चा करेन. मी काही चुकीचं बोललो नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असं ते म्हणाले.
पाहा ॲश्ले बार्टीचा प्रवास
[visual_portfolio id="5340"]