

मुंबई : राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी आज जाहीर करण्यात आली. विविध प्रवर्गांनुसार ठरविण्यात आलेल्या या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणावर मोठा प्रभाव पडणार आहे.
जाहीर यादीनुसार, ठाणे, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ यांसह नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांसाठी सर्वसाधारण प्रवर्ग खुला ठेवण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, सांगली, कोल्हापूर, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली यांसारख्या जिल्ह्यांत सर्वसाधारण (महिला) आरक्षण लागू करण्यात आले आहे.
अनुसूचित जातीसाठी बीड (महिला), हिंगोली, परभणी, वर्धा आणि चंद्रपूर (महिला) ही पदे आरक्षित करण्यात आली आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी पालघर, नंदुरबार, अहिल्यानगर (महिला), अकोला (महिला) आणि वाशिम (महिला) या जिल्ह्यांतील अध्यक्षपदे राखीव ठेवली गेली आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) साठी रत्नागिरी (महिला), धुळे (महिला), सातारा (महिला), सोलापूर, जालना (महिला), नांदेड, धाराशिव (महिला), नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या आरक्षण घोषणेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांतील राजकीय गणिते ठरविण्यात महत्त्वाचा बदल होणार आहे. पक्षीय स्तरावर उमेदवार ठरविताना या आरक्षणाचा विचार करावा लागणार असून, महिला आरक्षणामुळे अनेक जिल्ह्यांत नवीन नेतृत्वाला संधी मिळणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात कोणते आरक्षण ?
1. ठाणे -सर्वसाधारण (महिला)
2. पालघर – अनुसुसूचित जमाती
3. रायगड- सर्वसाधारण
4. रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
5. सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
6. नाशिक -सर्वसाधारण
7. धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
8. नंदूरबार-अनुसूचित जमाती
9. जळगांव – सर्वसाधारण
10. अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
11. पुणे -सर्वसाधारण
12. सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
13. सांगली – सर्वसाधारण (महिला)
14. सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
15. कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
16. छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
17. जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
18. बीड – अनुसूचित जाती (महिला)
19. हिंगोली -अनुसूचित जाती
20. नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
21. धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
22. लातूर – सर्वसाधारण (महिला)
23. अमरावती – सर्वसाधारण (महिला)
24. अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
25. परभणी – अनुसूचित जाती
26. वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
27. बुलढाणा -सर्वसाधारण
28. यवतमाळ- सर्वसाधारण
29. नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
30. वर्धा- अनुसूचित जाती
31. भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
32. गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
33. चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
34. गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)