Worli Flyover: वरळी उड्डाणपूल, सबवे जानेवारीमध्ये होणार खुला; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

वरळीतील नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगणदरम्यानचा उड्डाणपूल व सबवे ३१ जानेवारीपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
Worli Flyover
Worli FlyoverPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगण दरम्यान बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम ४ महिन्यात काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे ३१ जानेवारीपर्यंत उड्डाणपूल व सबवे वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

उड्डाणपूल व सबवेच्या प्रकल्पाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवार ३० सप्टेंबरला प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कामांची सद्यस्थिती, प्रगती तसेच पुढील कार्यवाहीचा आढावा घेतला.

Worli Flyover
Thane Cyber Fraud: सायबर भामट्यांचा सुळसुळाट; ठाणेकरांचे ४.५३ कोटी संकटात

नेहरू विज्ञान केंद्राच्या बाजूला १२०० मिमी व्यासाच्या मुख्य पाइलचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. १८ पैकी १७ पाइल कॅप, १८ पैकी १७ पिअर आणि १८ पैकी १७ पिअर कॅपचे काम पूर्ण झाले आहे. त्याशिवाय जिजामाता नगरच्या बाजूला १२०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे.

पोर्टल बीम व गर्डर निर्मितीचे काम प्रकल्पस्थळी तसेच निर्मिती केंद्रात सुरू असून १४ पैकी १४ पोर्टल बीमचे काम पूर्ण झाले असून, १८ गर्डर स्पॅनपैकी १७ गर्डर स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १ गर्डर स्पॅनचे काम प्रगतिपथावर असल्याचे बांगर यांनी सांगितले.

पोर्टल बीम व गर्डर स्पॅन उभारणीचे कामदेखील वेगाने सुरू आहे. एकूण १४ पैकी १३ पोर्टल बीमची उभारणी पूर्ण झाली असून, १८ पैकी ९ गर्डर स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे. डेक स्लॅब काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून २ स्पॅनचे काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर असल्याचेही बांगर यांनी स्पष्ट केले आहे.

Worli Flyover
JJ Hospital Mumbai: 'जेजे सुपर स्पेशालिटी'ची सात वर्षांनंतरही प्रतीक्षाच

प्रवासाचा वेळ कमी होणार

नेहरू विज्ञान केंद्र उड्डाणपुलामुळे नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. सध्या या मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांना वरळी नाका (आचार्य अत्रे चौक) येथून वळसा घालून जावे लागते. त्यामुळे प्रवास १५ मिनिटांनी कमी होणार आहे.

या पुलामुळे ई. मोझेस मार्गावरून थेट अ‍ॅनी बेझंट मार्ग तसेच कोस्टल रोड जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. लोअर परळ, महालक्ष्मी आणि करी रोडकडून येणाऱ्या वाहनांनाही या पुलाचा थेट वापर करता येणार आहे.

परिणामी, वरळी नाका परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून इंधनाचीही बचत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news