Worli BJP rally case : वरळीतील भाजपा रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

नियमांचे उल्लंघन केल्याचा पोलिसांचा आरोप
Crime  News
Crime News pudhari
Published on
Updated on

मुंबई : महिला आरक्षण विधेयकासाठी वरळी येथे भाजपाकडून आयोजित करण्यात आलेल्या रॅलीच्या आयोजकाविरुद्ध वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचा या आयोजकावर आरोप आहे. दरम्यान या रॅलीमुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता, याबाबत सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर मुंबई पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जाते.

Crime  News
BJP Worker Attack Case: भाजपाच्या तालुका पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; सहा जणांना अटक

या रॅलीसाठी वरळी पोलिसांकडून रीतसर परवानगी घेण्यात आली होती. काही अटींवर ही परवानगी पोलिसांकडून देण्यात आली होती.

रॅलीत पंधरा ते वीस हजाराहून महिला आणि पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे तेथील वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या रॅलीबाबत एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारुन आपला संताप व्यक्त केला होता. इतकेच नव्हे तर गिरीश महाजन यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले होते. इथून चालते व्हा, तुमच्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. ही रॅली मोकळ्या मैदानात का आयोजित केली नाही असे अनेक प्रश्न विचारले होते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

Crime  News
Vasai Police Attack: वसईत ट्रिपलसीट कारवाईदरम्यान पोलिसावर प्राणघातक हल्ला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news