सरकारी योजनेच्या नावाने महिलेचे दागिने पळविले

वांद्रे येथील घटना; आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
jewelry Theft
सरकारी योजनेच्या नावाने महिलेचे दागिने पळविलेFile Photo

सरकारी योजनेतर्ंगत सात हजार रुपये मिळणार असल्याची बतावणी करुन फोटोसाठी दागिने काढण्यास प्रवृत्त करुन एका महिलेने दुसर्‍या महिलेचे दागिने घेऊन पलायन केल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. याप्रकरणी पळून गेलेल्या महिलेविरुद्ध वांद्रे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तिचा शोध सुरु केला आहे.

jewelry Theft
म्हाडा फ्लॅटच्या नावाने महिलेची २३ लाखांची फसवणुक

तक्रारदार महिला ही वांद्रे येथे राहते. गेल्या आठवड्यात ती कामावरुन घरी जात होती. यावेळी तिला एका अज्ञात महिलेने थांबविले. सरकारने महिलांसाठी एक योजना सुरु असून या योजनेतर्ंगत प्रत्येक महिलेला दरमाह सात हजार रुपये मिळणार आहे. या योजनेचा अर्ज भरण्यास प्रवृत्त करुन तिने तिला फोटो काढण्यासाठी रिक्षातून अंधेरी येथे आणले. फोटो काढताना तिने तिला अंगावरील दागिने काढण्यास सांगितले. दागिने दिसल्यास तिला योजनेचा लाभ मिळणार नाही असे सांगितले. त्यामुळे तिने तिच्या अंगावरील दागिने तिला दिले होते.

jewelry Theft
नोकरीचे अमिष दाखवून दांपत्याकडून युवकाची फसवणुक

बाहेर असल्याचे सांगून ती महिला तेथून पळून गेली. फोटो काढल्यानंतर तक्रारदार महिला बाहेर आली असता तिला ती महिला कुठेच दिसली नाही. जवळपास दोन तास तिची वाट पाहिल्यानंतर तिने वांद्रे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून पळून गेलेल्या महिलेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news