नोकरीचे अमिष दाखवून दांपत्याकडून युवकाची फसवणुक

देगलुरच्या घाटे दांपत्याला नायगाव पोलिसांकडून नऊ महिन्यांनी अटक
Scam the young man by luring him with a job
नोकरीचे अमिष दाखवून तरुणाला गंडाFile Photo Pudhari News

नायगाव : शाळेवर नोकरी लावतो म्हणून फसवणूक केल्या प्रकरणी एक वर्षापूर्वी गुन्हा दाखल झालेल्या देगलुरच्या घाटे दांपत्याला नायगाव पोलिसांनी तब्बल नऊ महिन्यांनी अटक केली आहे. या दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर पत्नीची न्यायालयीन कोठडी नंतर सुटका करण्यात आली आहे. पतीला गुरुवारी (दि.28) अटक करून नायगाव न्यायलयाने कोठडी मध्ये रवानगी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, घाटे दांपत्याने उधारीवर घेतलेले पाच लाख परत न देता शक्कल लढवून, शाळेवर नौकरी लावतो म्हणून फसवणूक केल्याची घटना घडली होती. फिर्यादीच्या तक्रारी वरून याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून नायगाव पोलिस ठाण्यात देगलूर येथील जगदीश तुकाराम घाटे आणि सिंहाबाई जगदीश घाटे यांच्या विरोधात 3 नोव्हेंबर 2023 रोजी फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Scam the young man by luring him with a job
आमगावात शेअर मार्केटचे अमिष दाखवून 3 कोटींची फसवणूक

टेंभुर्णी येथील राहूल गणपत टेंभुर्णीकर याने 2015 मध्ये जगदीश तुकाराम घाटे आणि सिंहाबाई जगदीश घाटे यांना पाच लाख रुपये उधारीवर दिले होते. हात उसणे घेतलेली रक्कम परत मिळण्यासाठी टेंभूर्णीकर यांनी घाटे दांपत्याकडे मागणी केली. सुरुवातीला रक्कम देण्यास टाळाटाळ केली नंतर पैसे परत देण्याऐवजी शाळेवर नोकरी लावण्याचे अमिष दाखवले. 2015 पासून पैसेही परत दिले नाहीत तसेच नोकरीही लावली नाही. त्यामुळे घाटे दांपत्याने फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राहूल टेंभूर्णीकर यांनी पुराव्यासह नायगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.नायगाव पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद केला नसल्याने त्यांनी नायगाव येथील कनिष्ठ न्यायालयात दाद मागितली.

सदर प्रकरणी न्यायाधिशांनी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. यावरून देगलूर येथील जगदीश तुकाराम घाटे व सिंहाबाई जगदीश घाटे या दांपत्याविरुद्ध नायगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपी जगदीश घाटे याना गुरुवारी अटक करून नायगाव कनिष्ठ स्तर न्यायालय येथे हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी केली आहे. अशी माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे सपोनी पंडित यांनी दिली .

Scam the young man by luring him with a job
बारामती : इन्स्टाग्रामवर झाली ओळख; लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news