म्हाडा फ्लॅटच्या नावाने महिलेची २३ लाखांची फसवणुक

एजंट सांगणार्‍या महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Fraud of an  woman
महिलेची फसवणुकPudhari File Photo

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : म्हाडा फ्लॅटच्या नावाने एका महिलेची सुमारे २३ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी स्नेहा रामचंद्र वेरणेकर आणि निरज शाम विश्‍वकर्मा या दोन भामट्यांविरुद्ध समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील स्नेहाला अशाच एका गुन्ह्यांत यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. तक्रारदार महिला कांदिवली परिसरात राहत असून आठ वर्षांची तिची निरजशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती.

Fraud of an  woman
Nashik News | नाशिक जिल्ह्यातील ४८ द्राक्ष उत्पादकांची दीड कोटीची फसवणूक

त्याने स्नेहा ही त्याची मावशी असून ती म्हाडा एजंट म्हणून काम करते. भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहण्यापेक्षा स्नेहा तिला म्हाडाचा एक स्वस्तात फ्लॅट मिळवून देईल असे सांगून तिचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर विश्‍वास ठेवून ती स्नेहाला भेटण्यासाठी जून २००२ रोजी कांदिवली येथे आली होती. यावेळी तिने तिला कांदिवलीतील महावीरनगर, म्हाडा वसाहतीत ३२ लाखांचा फ्लॅट देण्याचे मान्य केले. त्यासाठी तिने तिच्याकडून सुमारे २३ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर तिला फ्लॅटची चावी दिली होती. मात्र ती चावी त्या फ्लॅटची नव्हती.

Fraud of an  woman
ऊसतोड मजूर पुरवितो म्हणून 12 लाखांची फसवणूक

चौकशीअंती तो फ्लॅट म्हाडाचा असून म्हाडा लॉटरी पद्धतीने फ्लॅटची विक्री करते. कुठल्याही एजंटमार्फत म्हाडा फ्लॅटची विक्री होत नसल्याचे तिला समजले होते. या दोघांकडून फ्लॅटच्या नावाने फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र त्यांनी पैसे तसेच फ्लॅट देणार नाही असे सांगून तिला धमकाविले होते. त्यामुळे तिने या दोघांविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर स्नेहा वेरणेकर आणि निरज विश्‍वकर्मा या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news