Mumbai Crime
कौटुंबिक वादातून पत्नीवर जीवघेणा हल्ला; प्रकृती गंभीरFile Photo

Mumbai Crime : अंधेरीत पत्नीवर कोयत्याने हल्ला

44 वर्षांच्या आरोपी पतीला एमआयडीसी पोलिसांनी केली अटक
Published on

मुंबई : अंधेरी येथे राहणाऱ्या नीता विश्वनाथ भोपळे (वय 48) या महिलेवर तिच्याच पतीने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकणी संतोष फकिरा रावते या 44 वर्षांच्या आरोपी पतीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता अंधेरीतील एमआयडीसी, कनाकिया, सह्योग एसआरए सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीच्या तेराव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 1303 मध्ये ते राहतात. नीता नोकरी करत असून तिचा पती संतोष काहीच कामधंदा करत नाही. याच कारणावरुन त्यांच्यात नेहमी खटके उडत होते.

Mumbai Crime
Mumbai Accident : अपघातात मान कापली; दुचाकीस्वार जागीच ठार

रविवारी रात्री साडेनऊ वाजता मोबाईलवरून वाद झाले. त्याचा राग आल्याने त्याने तिच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. त्यात तिच्या दोन्ही हातांना, करंगळीला आणि डोक्याला दुखापत झाली होती. हा प्रकार समजताच स्थानिक रहिवाशांनी तिला तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. तिथेच तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Mumbai Crime
Dr. Pankaj Bhoyar : 17 हजार अनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news