Dr. Pankaj Bhoyar : 17 हजार अनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही

राज्यमंत्री पंकज भोयर यांची विधान परिषदेत माहिती
Schools Installed CCTV
17 हजार अनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्हीpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील 17 हजार अनुदानित शाळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून उर्वरित 4 हजार शाळांमध्ये लवकरच सीसीटीव्ही बसविले जातील, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील दहावी व बारावी परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शाळांमधील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत विधान परिषदेचे आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, अभ्यंकर, भाई जगताप यांनी सहभाग घेतला. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, राज्यातील खासगी अनुदानित 21 हजार शाळांपैकी 17 हजार शाळांनी सीसीटीव्ही बसविले आहेत.

Schools Installed CCTV
Student Scholarship Exam : पाचवी-आठवीची परीक्षा वादात

उर्वरीत शैक्षणिक संस्थां देखील सीसीटीव्ही बसविण्याची व्यवस्था करतील. आपल्या शासनाच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुमारे 65 हजार शाळांपैकी जिल्हा नियोजन समितीच्या 5 टक्के निधीतून आतापर्यंत 18 हजार शाळांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

डोंगरी भागातील शाळांसाठी स्वतंत्र डोंगरी विकास निधी उपलब्ध असून त्या माध्यमातूनही या भागातील शाळेत सीसीटीव्ही बसविण्याची सूचना करण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करून शासनाकडून कार्यवाही केली जाईल, असेही डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

Schools Installed CCTV
Eknath Shinde : सभागृहातील आश्वासनांची महिन्यात पूर्तता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news