‘हा’ आंबा लंगडा कसा?

‘हा’ आंबा लंगडा कसा?
Published on: 
Updated on: 

मुंबई : लोक उन्हाळ्याची आतुरतेने वाट पाहात असतात. कारण या सिझनमध्ये निरनिराळ्या प्रकारचे आंबे खायला मिळतात. तुमच्या माहितीसाठी भारतात तब्बल दीड हजार प्रकारच्या आंब्यांची शेती केली जाते. या सर्वच आंब्यांची चव वेगवेगळी असते. त्यातच आपल्याकडे हापूस, लंगडा आंबा, बदामी आंबा, केशर आंबा लोकप्रिय आहेत. यातील लंगडा आंबा हा अनेकांना त्याच्या नावामुळे थोडा वेगळा वाटतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या आंब्याला असे नाव का बरे दिले गेले असेल किंवा पडले असेल?

पद्मश्री हाजी कलीमुल्लाह यांनी लंगडा आंब्याबद्दल सांगितले की, साधारण अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वी बनारसच्या काशीमध्ये लंगडा आंब्याची शेती सुरू करण्यात आली होती. बनारसमध्ये एका पायाने दिव्यांग व्यक्ती राहात होती. त्याला त्याच्या जवळचे लोक प्रेमाने लंगडा म्हणून हाक मारायचे. एकदा एक आंबा या व्यक्तीने खाल्ला आणि त्याला तो खूपच आवडला. या आंब्याची कोय त्याने अंगणात लावली. काही वर्षांनी या झाडाला भरपूर आंबे येऊ लागले. ते फारच स्वादिष्ट होते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या नावावर सर्वांनी मिळून या आंब्याचे नाव लंगडा आंबा ठेवले. भारतात अनेक ठिकाणी लंगडा आंब्याचे उत्पादन घेतले जाते. पण बनारसमधील लंगडा आंब्याची चवच निराळी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news