

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
गर्दीच्या मार्गावर वेगाने धावणाऱ्या लोकल गाड्यांमधील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि अपघात मुक्त व्हावा म्हणून भारतीय रेल्वेने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्क मध्ये 'कवच ५.०' ही प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. तांत्रिक बिघाड किंवा मानवी चुकीमुळे होणारे संभाव्य अपघात रोखण्यासाठी हे डिजिटल पाऊल मुंबईकरांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
येत्या डिसेंबरपर्यंत उपनगरीय मार्गावर ट्रॅक, लोको इंजिन आणि स्टेशनवर हे कवच लावले जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांनी सांगितले.
डिसेंबरपर्यंत उपनगरीय मार्गावर ट्रॅक, लोको आणि स्टेशनवर लागणारे कवच लावले जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांनी स्पष्ट केले. उपनगरीय लोकल खूपच वर्दळीची आहे.
येथे दर ३ मिनिटाला एक गाडी चालते. त्यामुळे प्रथम मुख्य मार्गावर कवच ४ लावले गेले आहे. विरार ते राम मंदिर रोड या ३५ किलोमीटर ट्रॅकवर लोको चाचणी झाली आहे. राम मंदिर ते चर्चगेट दरम्यान टॉवर लावणे, साहित्य लावणे अशी कामे सुरु आहेत. चर्चगेटपर्यंत डिसेंबर पर्यंत कवच ५.० लावून पूर्ण करण्याचा प्रयत्न केले जात असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.
२०२५-२६ मध्ये १६ मोठे रेल्वे अपघात झाले आहेत. जेव्हा ट्रॅकवर दोन रेल्वे समोरा समोर आल्यास कवच दोन्ही रेल्वे गाड्यांना मध्येंच थांबविणार आहे. १६० प्रति तास धावणाऱ्या ट्रॅकवर हे कवच असणार आहे. गुजरात येथील विरमगाव ते ओखा या ४३४ किलो मीटरमध्ये कवच अमलात आणले आहे.
मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर अजूनही व्हर्जन ४ चे काम सुरु आहे.
विरार-सुरत वडोदरा, वडोदरा - अहमदाबाद आणि वडोदरा-नागदा अशा एकूण ६६० किलो मीटर ट्रॅकवर कवच कमिशन झाले. ३० जानेवारी रोजी मुंबईवरून दादर - भुज सह्याद्री नगर एक्सप्रेस ट्रेनवर कवच लावण्यात आले होते. एकूण ९१५ लोको इंजिनपैकी ५३४ लोको इंजिनवर हे कवच लावण्यात आले आहे.
प्रगत सुरक्षा व सिग्नलिंग प्रणाली : उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी डिझाइन केलेली अत्यंत प्रगत रेल्वे सुरक्षा आणि सिग्नलिंग प्रणाली असणारी 'कवच ५.०' ची घोषणा एप्रिल २०२५ मध्ये करण्यात आली होती.
तंत्रज्ञान अन् चाचणी : वंदे भारत ४.० च्या प्रगत सुरक्षा आणि तंत्रज्ञान चौकटीचा एक भाग म्हणून भारताच्या स्वदेशी बनावटीच्या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीची 'कवच ५.०' प्रगत आवृत्ती आहे.
चाचणी व मंजुरी : 'कवच'ची पहिली चाचणी फेब्रुवारी २०२६ मध्ये झाली. तर १६ जुलै २०२४ रोजी 'कवच व्हर्जन ४.०' च्या फीचर्सना मंजुरी मिळाली होती.