Western Railway Land Encroachment : बोरिवली-विरार विस्तार मार्गाचा मार्ग मोकळा

विस्तारामधील अडथळे दूर करण्यासाठी २८ अनधिकृत बांधकामे हटवली
Western Railway Land Encroachment
Western Railway Land EncroachmentAI Image
Published on: 
Updated on: 

मुंबई : बोरिवली आणि विरार दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेच्या विस्तारामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी पश्चिम रेल्वेने राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूकडील आपल्या जमिनीवरील २८ अनधिकृत बांधकामे हटवली आहेत. रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), शहर पोलीस आणि रेल्वेच्या इतर विभागांच्या सहकार्याने ही धडक कारवाई करण्यात आली.या मोहिमेमध्ये ४३ आरपीएफ जवान, ५ शहर पोलीस कर्मचारी, संबंधित रेल्वे विभागाचे अधिकारी-कर्मचारी व कंत्राटदाराचे २२ कामगार जेसीबी मशीनसह सहभागी झाले होते.

प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर सतत ताण येत असल्याने रेल्वेची जमीन अतिक्रमणमुक्त करणे हे विस्तार प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. रेल्वे पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी राबवलेली मोहीम एका व्यापक मोहिमेचाच भाग आहे.

Western Railway Land Encroachment
Palghar Khair Wood Smuggling : प्रवासी वाहनांमधून मौल्यवान खैराची तस्करी

बोरिवली-विरार पाचवी आणि सहावी मार्गिका प्रकल्प हा पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वे नेटवर्कची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी हाती घेण्यात आला आहे, जिथे दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या अतिरिक्त मार्गिमांमुळे गाड्यांच्या संचलनात सुसूत्रता येईल आणि संबंधित पायाभूत सुविधा व ऑपरेशनल व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर लोकल फेऱ्या वाढवण्यास अधिक वाव मिळेल. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता. या प्रकल्पामुळे रेल्वे प्रशासनावर येणारा ताण रोखण्यास मदत होणार आहे.

Western Railway Land Encroachment
Raigad School Repair Fund : रायगडमधील २० हजार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

रेल्वे प्रकल्पांना गती मिळणार

गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे जमिनीवरील अनधिकृत बांधकामामुळे मुंबईतील नियोजित विस्तार आणि पायाभूत कामांमध्ये मोठे अडथळे निर्माण होत होते. ही जागा मोकळी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाला नवीन रुग्णालय/मार्ग, स्थानक पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि रेल्वे टर्मिनन्सचा विकास यांसारख्या अतिरिक्त जमिनीची गरज असलेल्या प्रकल्पांना गती देणे शक्य होईल, अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.