Palghar Khair Wood Smuggling : प्रवासी वाहनांमधून मौल्यवान खैराची तस्करी

दहिसर वनपरीक्षेत्राच्या हद्दीत कारवाई; तस्करीच्या घटना रोखण्याचे आव्हान
Palghar Khair Wood Smuggling
Palghar Khair Wood Smugglingpudhari photo
Published on: 
Updated on: 

पालघर : प्रवाशी वाहनां मधून मौल्यवान खैराच्या ओंडक्यांची तस्करी वन विभागाने केलेल्या कारवाईत उघडकीस आणली आहे. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वांद्री धरणा लगतच्या सूलशेत गावाच्या हद्दीत केलेल्या कारवाई दरम्यान प्रवासी कार आणि दुचाकीसह तीन आरोपींना ताब्यात घेण्यात दहिसर वन परीक्षेत्राचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यश आले.

आरोपी विरोधात वनअधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैर तस्करीत सहभाग असलेल्या आणि बहिरीफोंडा ठाकूर पाडा सारख्या दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या एका आरोपींना ताब्यात घेण्यासाठी बुधवारी सकाळी पोलिसांची मदत घेण्यात आल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली.

Palghar Khair Wood Smuggling
Mahad Khadipatta Chemical Pollution : प्रदूषणाने खाडीपट्ट्यात खेकडा मच्छी नष्ट, भातशेती नापीक

मौल्यवान प्रजाती असलेल्या खैराच्या झाडांच्या ओंडक्यांना व्यावसायिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे.काळ्या बाजारात एक टन वजनाच्या खैराला तीस ते चाळीस हजारांपेक्षा अधिक दर मिळत असल्यामुळे खैराच्या लाकडाला बाजारात मागणी असते. बाजारातील मागणीमुळे अवैध वृक्षतोड आणि तस्करीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.अवैध कत्तलीमुळे मौल्यवान प्रजातीच्या वनसंपत्तीच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अवैध कत्तल आणि तस्करी रोखण्यासाठी वनविभागाकडून खैर लागवड असलेल्या क्षेत्रात गस्त आणि तपासणी मोहीम तीव्र केली आहे. वनविभागाच्या दहिसर वनपरीक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बहिरीफोंडा ठाकूर पाडा - ढेकाळे रस्त्यावरून प्रवाशी वाहनातून खैराच्या ओंडक्यांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती.बुधवारी पहाटे सापळा रचून खैर तस्करी करणाऱ्या एक इको कार आणि पेट्रोलिंगसाठी वापरण्यात येणारी दुचाकी ताब्यात घेण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.

तिघांना अटक कारण्यात आली होती.कारवाई दरम्यान एक आरोपी निसटल्याने पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. बुधवारी दुपारी दोन आरोपींना अटक करण्यात यश आले.आरोपी विरोधात वन अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.न्यायालयाकडून आरोपींना वन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Palghar Khair Wood Smuggling
Thane Water Shortage : पडघा गावात दहा दिवसापासून पाणीपुरवठा बंद

दहिसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश वाघमारे यांच्या नेतृत्वात केलेल्या कारवाईत वनरक्षक युनेश मेघा, प्रदीप पवार, विकास कांबळे, महेश हांडवा, वनमजूर भाईदास सातवी, वाहनचालक अश्विन वेडगा यांच्यासह दहिसर वनपरिक्षेत्रातील कर्मचारी आणि वनमजुरांनी सहभाग घेतला. खैर तस्करांनी तस्करीसाठी पद्धतीत बदल केला आहे.

मालवाहू टेम्पो ऐवजी प्रवासी वाहनांमधून खैराच्या ओंडक्यांची तस्करी केली जात असल्याचे दहिसर वनपरीक्षेत्राच्या हद्दीतील कारवाईत समोर आले आहे. वाढती तस्करीच्या घटना रोखण्याचे वनविभाग आणि पोलिसांपुढे मोठे आवाहन आहे.

वनविभागाकडून विशेष मोहिम

मौल्यवान प्रजातीच्या झाडांची अवैध तोड आणि लाकूड तस्करीमुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे.वृक्षतोडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाकडून विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत.वनसंपत्तीच्या संरक्षणाची सामूहिक जबाबदारी असल्याचे भान राखून अवैध वृक्षतोड किंवा लाकूड तस्करीची माहिती देण्याचे आवाहन करण्यात दहिसरच्या वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांनी केले आहे.

बहिरीफोंडा ठाकूरपाडा भागात सक्रिय असलेल्या खैर तस्करांनी वाहतूकीची पद्धत बदलली आहे.टेम्पो ऐवजी प्रवाशी वाहनांचा वापर सुरू केला आहे.खैर तस्करी विरोधात कारवाईसाठी गुप्त बातमीदारांची मदत घेतली जात असून गस्त वाढवण्यात आली आहे.

हृषीकेश वाघमारे, वनपरीक्षेत्र अधिकारी, दहिसर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.