

मुंबई : मतदार याद्यांमधील आपले नाव शोधण्याची जबाबदारी मतदारांचीही आहे, अशी भूमिका राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
गुरुवारी मुंबईत ठिकठिकाणी मतदारांची नावे गायब असल्याचे निदर्शनास आले. आणि त्यातून गोंधळही उडाला.
पत्रकार परिषदेत दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, निवडणूक आयोग पूर्णतः तटस्थ आहे. सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचा प्रश्नच येत नाही. आयोग कोणालाही झुकते माप देत नाही. या प्रकरणी मुद्दाम संभ्रम निर्माण केला जात आहे. फेक नरेटिव्ह पसरवला जात आहे.
सर्व गोष्टी आयोगावर ढकलल्या जात आहेत. खरे तर आपले नाव मतदार यादीत आहे याची खात्री करून घेण्याची जबाबदारी मतदाराचीही असते.
मुंबईसह सर्वच ठिकाणी दुबार मतदारांची ओळख पटल्याशिवाय मतदान करू दिले जात नाही. दुबार मतदारांना दोन ओळखपत्रे मागितली जातात. याशिवाय मतदान कक्षात मतदान प्रतिनिधीही असतात. ते उमेदवारांचे प्रतिनिधित्व करतात. तसंबंधित प्रभागातीलच ते असतात. त्यामुळे शाई पुसून पुन्हा एखादा मतदार आल्यास त्याच्यावर निश्चितच कारवाई होईल. तसेच या प्रकरणी आयोगही चौकशी करेल.
निवडणूक आयोग पूर्णतः तटस्थ आहे. सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचा प्रश्नच येत नाही. आयोग कोणालाही झुकते माप देत नाही. या प्रकरणी मुद्दाम संभ्रम निर्माण केला जात आहे. फेक नरेटिव्ह पसरवला जात आहे. सर्व गोष्टी आयोगावर ढकलल्या जात आहेत.