Vinayak Raut: विनायक राऊत यांना न्यायालयाचा मोठा झटका! अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळला; लवकरच अटक होणार?

Vinayak Raut Bail Plea Rejected: माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
Vinayak Raut Bail Plea Rejected
Vinayak Raut Bail Plea RejectedPudhari
Published on
Updated on

Vinayak Raut Bail Plea Rejected: शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जाला नकार दिला आहे. न्यायालयाने प्राथमिकदृष्ट्या आरोपांचे स्वरूप गंभीर असल्याचे नमूद करत हा अर्ज फेटाळून लावला.

विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी पती, सासरे आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात कौटुंबिक छळ तसेच नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी एकूण सात जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Vinayak Raut Bail Plea Rejected
Mental Health: राग व्यक्त करण्याऐवजी टोमणे मारता? नात्यांसाठी ठरू शकतं धोकादायक; तज्ज्ञांचा इशारा

या प्रकरणात कथित अघोरी कृत्यांशी संबंधित आरोपांवरून फिरोज शेख नावाच्या व्यक्तीला जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दरम्यान, अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांवर सुनावणी करताना न्यायालयाने आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन दिलासा देण्यास नकार दिला. ज्या व्यक्तींनी अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्यामध्ये विनायक राऊत, गितेश विनायक राऊत, श्यामल विनायक राऊत, सुरेखा राजेश सर्फरे आणि राजेश नारायण सर्फरे यांचा समावेश आहे.

Vinayak Raut Bail Plea Rejected
RBI Scheme: बँक तुमचं ऐकत नाही? RBIची नवी योजना; तुम्हाला मिळू शकतात 33 लाख रुपये, कोणती कागदपत्रे लागणार?

न्यायालयाच्या या निर्णयानंतर विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि इतर संबंधितांविरोधात पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून, तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. संबंधित पक्षांना न्यायालयात आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news