मुंबई : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये, या शब्दांत कानउघडणी करत मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रभाग क्र. 17-अ मधील निवडणुकीला दिलेली स्थगिती उठवली.
तांत्रिक कारणाने इथून उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलेल्या भाजप उमेदवार निलेश भोजने यांची उमेदवारी स्वीकारत त्यांच्या नावाचा चिन्हासह यादीत समावेश करून वाशीतील प्रभाग 17 अ मधील निवडणुकीला दिलेली स्थगिती उठवत नियोजित वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिले.
भोजने यांचा उमेदवारी अर्ज शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या तक्रारीवरून फेटाळण्यात आला होता. त्या विरोधात भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांनी दाखल केली होती.
या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी भोजने यांच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी सांगितले की, निवडणूक अधिकाऱ्यांनी कायद्याअंतर्गत घेतलेला निर्णय हा केवळ नगरसेवकांना लागू होतो. नगरसेवकपदाची निवडणूक लढवणा-या उमेदवाराला तो लागू होत नाही.
तसेच केवळ तक्रारीच्या आधारावर निर्णय घेण योग्य नाही, त्यासाठी लावलेले आरोप सिद्ध होणेही आवश्यक असते. केवळ तक्रारीच्या आधारावर निर्णय घेण योग्य नाही, त्यासाठी लावलेले आरोप सिद्ध होणेही आवश्यक असते. याकडे ॲड. सिरवई न्यायालयाचे लक्ष वेधले. तर निवडणूक अधिका-यांनी आपली चूक मान्य करत भोजने यांच्या नावाचा समावेश करण्यावर सहमती दर्शवली. त्यानंतर हायकोर्टाने यांची नोंद घेत याचिका निकाली काढली.