Vasai Virar Municipal Election NOTA: वसई-विरारमध्ये ‘नोटा’चा जोर; 42 हजार मतदारांनी उमेदवारांना ठाम नकार

महापालिका निवडणुकीत साडे दहा हजार मतदारांचा निषेधाचा कौल, बहुजन विकास आघाडीची सत्ता कायम
NOTA
NOTA Option In VotingPudhari News network
Published on
Updated on

वसई : वसई -विरार महानगरपालिका निवडणुकीत 42 हजार 207 मते ही ‌‘नोटा‌’ ला मिळाली आहेत. चार सदस्य प्रभाग पद्धतीत एका मतदाराला चार मत देण्याचा अधिकार होता. साडे दहा हजार मतदारांनी नोटाचा पर्याय निवडून उमेदवारांना नाकारले. महापालिकेच्या एकूण 29 प्रभागातून एकूण 57.12 टक्के इतके मतदान झाले होते.

NOTA
Mulund digital arrest fraud: मुलुंडमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची 40 लाखांची सायबर फसवणूक

या निवडणुकीसाठी एकूण 11 लाख 26 हजार 400 मतदार होते. त्यापैकी 6 लाख 1 हजार 141 पुरुष (53%) तर 5 लाख 25 हजार 113 (47%) महिला मतदार आहेत. याशिवाय 146 तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता. या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष व अपक्ष असे एकूण 547 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

बहुजन विकास आघाडी( 4 काँग्रेस आणि 1 मनसे सह) 113, भाजप 88, शिवसेना (शिंदे गट)27, शिवसेना ( ठाकरे गट) 89, राष्ट्रवादी काँग्रस(अजित पवार ) 13, एमआयएम 7, बसपा 14, काँग्रेस 10, वंचित12 ,अपक्ष 167 यांचा समावेश होता.

NOTA
Navi Mumbai Election Result: नवी मुंबई पालिकेत 61 माजी, तर 50 नवे नगरसेवक

या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे( 4 काँग्रेस आणि 1मनसे सह) 71, भारतीय जनता पक्षाचे 43 व शिवसेना (शिंदे गट) असे नगरसेवक निवडून आले आहेत.एकंदरीतच वसई-विरारमधील हे बदलेले चित्र नागरी समस्या सोडवण्यात कितपत प्रयत्नशील असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रदीपिका सिंह बहुजन विकास आघाडीच्या तरुण उमेदवार वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीने महानगरपालिका निवडणुकीत बहुमत मिळवत पुन्हा एकदा आपली सत्ता स्थापन केली आहे. यावर्षीची निवडणूक विविध मुद्यांनी चर्चेत राहिली आहे. विशेष म्हणजे वसई पूर्वेतील बहुजन विकास आघाडीच्या प्रभाग 8 (ब) मधून निवडून आलेल्या 23 वर्षीय महिला उमेदवार प्रदीपिका सिंह सध्या जोरदान चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

NOTA
Tata Mumbai Marathon: टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्यासोबत समाजजागृतीचा उत्सव, ड्रीम रनमध्ये 27 हजारांचा सहभाग

वसईतील 8 (ब) या सर्वसाधारण महिला आरक्षण असणाऱ्या प्रभागातून बहुजन विकास आघाडी पक्षाच्या उमेदवार प्रदीपिका सिंह यांनी निवडणूक लढवली होती. निकालाअंती त्यांना तब्बल 13 हजार 922 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या उमेदवार कल्याणी पाटील यांना 9 हजार 889 nइतकी मते मिळाली आहेत. कल्याणी पाटील यांचा पराभव करत वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी नगरसेविका बनण्याचा बहुमान पटकावला आहे. दरम्यान शहरातील विविध प्रलंबित सर्व प्रश्न बहुजन विकास आघाडी सत्तेत आल्यामुळे मार्गी लागतील, असा विश्वासही सिंह यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, महापालिकेच्या एकूण 29 प्रभागातून एकूण 57.12 टक्के इतके मतदान झाले होते.

NOTA
Sanjay Gandhi National Park: मुंबईतील नॅशनल पार्कमध्ये पाडकामाची नोटीस, आदिवासींच्या घरांवर निराश्रिततेचे सावट

मतदानाची आकडेवारी काय सांगते?

वसई -विरार महापालिकेत मध्ये 11 लाख 26 हजार 400 मतदारांपैकी 6 लाख 43 हजार 427 मतदारांनी मतदान केले. यात 3 लाख 47 हजार 479 पुरुष व 2 लाख 95 हजार 924 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला,तसेच इतर 24 मतदारांचा समावेश आहे. असे एकूण 57.12 टक्के इतके मतदान झाले होते. या 6 लाख 43 हजार पैकी वसई विरार मध्ये सुमारे साडे दहा हजार मतदारांनी 42 हजार 207 मत ही नोटा ला देत उमेदवारांना नाकारले असल्याचे मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news