Mumbai Civic Water Management
Upper Vaitarna lake dry(File Photo)

Mumbai Water Crisis | अप्पर वैतरणा तलाव आटला,पाणी साठा १.५६ टक्क्यांवर

Water Shortage | अन्य तलावांतील पाणीसाठाही कमी झाला असून सात तलावांमध्ये सध्या 10 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
Published on

Mumbai Civic Water Management

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारा नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलाव आटला आहे. या तलावात 1.56 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अन्य तलावांतील पाणीसाठाही कमी झाला असून सात तलावांमध्ये सध्या 10 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राखीव कोट्यातील पाण्याने मुंबईकरांची तहान भागवावी लागणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस दाखल झाला नसल्यामुळे तलावातील पाण्याची पातळी घसरत आहे. शहराला दररोज 1850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणार्‍या भातसा तलावातील पाणीसाठाही कमी होत आहे.

Mumbai Civic Water Management
Mumbai News: मुंबई आता तरी दोन शिफ्टमध्ये काम करणार? सुरेश प्रभूंनी चर्चा केल्यानंतर अजूनही योजना कागदावरच

या तलावात 7.89 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. या तलावात 7 लाख 17 हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. पण सध्या 56 हजार दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. अन्य तलावांतील पाणीसाठाही दिवसेंदिवस खालावत आहे. तानसा तलावातील पाणीसाठा 10 टक्क्यांवर आला आहे. महापालिकेने राखीव कोट्यातून पाणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Civic Water Management
Water Crisis: खेडमधील 17 गावांत 9 टँकरने पाणीपुरवठा; हंडाभर पाण्यासाठी पायपीट

तलावातील सध्याचा पाणीसाठा

अप्पर वैतरणा - 3,540

मोडकसागर - 36,649

तानसा - 15,745

मध्य वैतरणा - 26,614

भातसा - 56,591

विहार - 9,199

तुळशी - 2,392

Mumbai Civic Water Management
Water Crisis: पाणी जपून वापरा! घोरवडी धरणाचा पाणीसाठा 23 टक्क्यांवर

पाणीटंचाईचे संकट

तलाव क्षेत्रात पाऊस 15 ते 20 दिवस लांबल्यास मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढावू शकते. तलावातील सध्याचे पाणी मुंबईकरांना अजून महिना ते दोन महिने पुरवण्यासाठी काही टक्के पाणीकपात करावी लागेल, असे जल अभियंता विभागातील काही वरिष्ठ अभियंत्यांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news