UP Warriors vs Mumbai Indians: हरलीन देओलच्या दमदार खेळीवर यूपी वॉरियर्सची मुंबईवर मात

डब्ल्यूबीएल 2026 मध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा 7 गडी राखून पराभव, यूपीचा पहिला विजय
UP Warriors vs Mumbai Indians
UP Warriors vs Mumbai IndiansPudhari
Published on
Updated on

नवी मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2026 (डब्ल्यूबीएल) मधील आठव्या सामन्यात गुरुवारी यूपी वॉरियर्सने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा 7 गडी राखून पराभव केला. सलग तीन पराभवांनंतर यूपीने या स्पर्धेतील आपला विजयाचा श्रीगणेशा केला, तर मुंबईची विजयाची हॅट्ट्रिक थोडक्यात हुकली.

UP Warriors vs Mumbai Indians
MS Dhoni Pune Grand Tour: महेंद्रसिंग धोनी पुणे ग्रँड टूर 2026चा गुडविल ॲम्बेसिडर

नॅट सायव्हर-ब्रंटचे झुंजार अर्धशतक

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात संथ झाली. अमनजोत कौरने 38 धावांचे योगदान दिले, तर कर्णधार हरमनप्रीत कौर (16) स्वस्तात बाद झाली. मात्र, नॅट सायव्हर-ब्रंटने एकाकी झुंज देत 43 चेंडूंत 9 चौकार आणि 1 षटकारासह 65 धावा कुटल्या. निकोला केरीने (नाबाद 32) तिला चांगली साथ दिली, ज्यामुळे मुंबईने 20 षटकांत 5 बाद 161 धावांपर्यंत मजल मारली.

UP Warriors vs Mumbai Indians
Election Commission: मतदार यादीत नाव तपासण्याची जबाबदारी मतदारांचीही – आयुक्त दिनेश वाघमारे यांची स्पष्ट भूमिका

हरलीन देओलचा ‌‘वन मॅन‌’ शो

162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्सने दमदार सुरुवात केली. मेग लॅनिंग (25) आणि फोबी लिचफिल्ड (25) यांनी धावसंख्या शंभरी पार नेली. मात्र, सामन्याचे खरे आकर्षण ठरली ती हरलीन देओल. हरलीनने केवळ 39 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 64 धावांची आक्रमक खेळी केली. तिला क्लो ट्रायॉनने (नाबाद 27) सुरेख साथ दिली. यूपीने हे लक्ष्य 18.1 षटकांतच 3 गडी गमावून पूर्ण केले.

UP Warriors vs Mumbai Indians
BMC Election 2026 Result Live Update: मुंबई महानगरपालिकेचा पहिला निकाल जाहीर; काँग्रेसच्या आशा दीपक काळे विजयी

संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स महिला संघ 20 षटकांत 5 बाद 161(नॅट सायव्हर-ब्रंट 65, अमनज्योत 38; दीप्ती शर्मा 31/1)

यूपी वॉरियर्स महिला संघ : 18.3 षटकांत 3 बाद 162/3 (हरलीन देओल नाबाद 64, क्लो ट्रायॉन नाबाद 27 ; नॅट सायव्हर-ब्रंट 28/2)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news