Maharashtra Politics: विधान परिषदेच्या जागेवरून काँग्रेस, ठाकरे गटात रस्सीखेच

विधानसभेत आमचे 20 आमदार असल्याने या जागेवर आमचा दावा असल्याचे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे; तर राज्यसभेसाठी आम्ही त्याग केला, असे काँग्रेसचे नेते सांगत आहेत.
Vidhan Parishad Election
Vidhan Parishad ElectionPudhari
Published on
Updated on

मुंबई:‌ विधान परिषदेच्या रिक्त नऊ जागांपैकी महाविकास आघाडीचे संख्याबळ बघता केवळ जागा त्यांच्या वाट्याला 1 जागा येत असल्याने उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. मात्र आघाडीत सर्वाधिक 20 आमदार उद्धव ठाकरे गटाचे असल्याने त्यांनी या जागेवर दावा केला आहे.

Vidhan Parishad Election
Paneer Labeling Rule: पनीर कशाचे खाताय? ‘दुधापासूनचे पनीर‌’ असा स्पष्ट उल्लेख मेनूवर करण्याचे फर्मान

राज्यसभेची एक जागा शरद पवार यांच्यासाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने माघार घेतली होती. त्यामुळे विधान परिषदेच्या जागेसाठी दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ही जागा महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गट लढवेल, असे समजते.

Vidhan Parishad Election
Strike Impact: कर्मचारी संपाचा फटका दवाखान्यांना; शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही जागा लढवावी, असा ठाकरे गटातील नेत्यांचा आग्रह आहे. पण तब्येतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे यांनी ही जागा लढवली नाही तर ठाकरे गटाकडून दुसरा उमेदवार दिला जाईल. पण हा उमेदवार कोण असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. काँग्रेसकडून या जागेसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक नेते इच्छुक आहेत. तसेच ठाकरे गटाकडून या जागेसाठी अनेक नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news