Uddhav Thackeray: ट्विस्ट येणार; उद्धव ठाकरेही दिल्लीत दाखल होणार... भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या?

Uddhav Thackeray
Uddhav Thackeraypudhari
Published on
Updated on

Uddhav Thackeray Delhi Visit: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर २.० अंतर्गत शिवसेनेचे ६ खासदार आपल्या गोटात खेचण्याच्या तयारीत आहेत.

Uddhav Thackeray
Political News: राज्‍यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार; ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदेंच्या गळाला

उद्धव ठाकरे उलटा डाव टाकणार?

राज्यातील राजकीय धुरळा आता दिल्लीत पोहचला असून खुद्द उद्धव ठाकरे दिल्लीत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान अनिल देसाई आणि संजय राऊत हे ठाकरेंचा विश्वासू शिलेदार हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळं या ऑपरेशन टायगर २.० मध्ये मोठा ट्विस्ट देखील येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उद्धव ठाकरे सेनेकडून पडद्यामारून चर्चा सुरू करण्यात आल्या आहेत. लवकरच उद्धव ठाकरे हे दिल्लीत खासदारांची बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खासदारांचे बंड थंड करण्यासाठी काय करता येईल यासाठी आता स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत.

Uddhav Thackeray
Political News: विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआसमोर मोठे आव्हान; बीडसह काही जागांवर उमेदवारीबाबत अद्याप निर्णय नाही

भाजपच्या त्या नाराज नेत्यांशी संपर्क

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे ऑपरेशन टायगर थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरे देखील दिल्लीत जाण्याची शक्यता आहे. ठाकरे कुटुंबीय काही भाजप नेत्यांच्या संपर्कात देखील आहेत अशी माहिती समोर येत आहे. वाटाघाटी करून एकनाथ शिंदे यांच्यावर मात करण्याचा ठाकरेंचा प्रयत्न दिसून येत आहे.

Uddhav Thackeray
Shinde vs Thackeray | ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदेंना भेटले; एकाला मंत्रिपदाची ऑफर

जे भाजप नेते शिंदेंवर नाराज आहे त्यांच्या भेटीगाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रयत्न करत आहेत. त्यांना संपर्क करून भाजपकडूनच शिंदेचे हे ऑपरेशन टायगर कसं थांबवता येईल याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांनी खासदारांना व्हीप काढला आहे.

मतदारांशी गद्दारीच्या प्रयत्नात असलेले ६ खासदार

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ९ खासदार निवडून आले होते. त्यातील ६ खासदार हे शिंदे गाटत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात संजय जाधव, संजय पाटील, बापूराव अष्टीकर, ओमप्रकाश राजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय देशमुख यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news