Kurar police bribery arrest : कुरार ठाण्यातच लाच घेताना दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक

वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश
Kurar police bribery arrest
कुरार ठाण्यातच लाच घेताना दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटकPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : कुरार पोलीस ठाण्यात एक लाख रुपयांची लाच घेताना दोन पोलीस अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. अटक अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव बळीराम तावडे आणि पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गोविंदराव जुने यांचा समावेश आहे.

फसवणुकीसह लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत कारवाई न करण्यासाठी त्यांनी दोन लाख रुपये घेऊन उर्वरित एक लाख रुपयांची मागणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. यातील तक्रारदार मालाड येथे राहत असून त्यांच्याविरुद्ध अलीकडेच एका व्यक्तीने फसवणुकीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याच भावाने त्यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार करुन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती.

Kurar police bribery arrest
CM Devendra Fadnavis : गडचिरोलीत दहशतीचे शेवटचे चिन्ह हटले

या दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जुने यांच्याकडे होता. चौकशीसाठी आलेल्या तक्रारदारांना त्यांनी गुन्ह्यांत मदत करण्यासाठी तसेच दोन्ही प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तीन लाखांची लाचेची मागणी केली होती. ही लाच त्यांनी त्यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे यांच्या वतीने मागितली होती. त्यामुळे त्यांनी त्यांना दोन लाख रुपये दिले होते. मात्र उर्वरित एक लाखांच्या रक्कमेसाठी ते त्यांना सतत कॉल करत होते. ही रक्कम दिली नाहीतर त्यांच्यावर कारवाईची धमकी देत होते.

लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 22 जानेवारीला संजीव तावडे आणि ज्ञानेश्वर जुने यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बुधवारी या पथकाने कुरार पोलीस ठाण्यात सापळा लावला होता.

Kurar police bribery arrest
Sambhajiraje | अरबी समुद्रात शिवस्मारक होईल, असे वाटत नाही : संभाजीराजे
  • यावेळी तक्रारदाराकडून लाचेचा एक लाखांचा दुसरा हप्ता घेताना ज्ञानेश्वर जुने यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत संजीव तावडे यांचा सहभाग उघडकीस आला होता, त्यामुळे त्यांनाही नंतर या गुन्ह्यांत अटक करण्यात आली. अटकेनंतर या दोघांनाही गुरुवारी दुपारी विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news