Mumbai Local Train Assault: लोकलमध्ये दोन तृतीयपंथींनी प्रवाशाला चोपले; सापळा रचून चोवीस तासांत दोघांना पकडले

या दोन्ही तृतीयपंथीयांनी प्रवाशाला ढकलतच डब्यात आणले आणि दोघेही प्रवाशावर अक्षरश: तुटून पडले. प्रवाशाला होत असलेली मारहाण अन्य प्रवासी शांतपणे बघत होते.
Mumbai Local
Mumbai LocalPudhari
Published on
Updated on

मुंबई: संध्याकाळच्या वेळेला धावत्या लोकलमध्ये एका पुरुष प्रवाशाला दोन तृतीयपंथीयांनी बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडीओ रविवारपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यावर मुंबईकरांनी प्रचंड संताप व्यक्त करत रेल्वे सुरक्षा यंत्रणेला धारेवर धरले. रेल्वे पोलिसांनी मात्र सापळा रचून चोवीस तासात या दोघा तृतीयपंथीयांना शरण आणले.

रेल्वे पोलिसांनी दोन्ही तृतीयपंथीयांना दादर सेंट्रल रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले, असे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रवासात अनेक हिंसक घटना घडू लागल्याने जागरूक प्रवाशांकडून आक्षेपार्ह अशा घटनांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे.

Mumbai Local
Fake Cosmetics: भेसळयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा भडिमार; संपूर्ण आरोग्यावर थेट वार

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलै रोजी या दोन तृतीयपंथीचा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांकडून व्हिडिओच्या आधारे सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करण्यात आले. सर्व स्टेशनवर पाळत ठेवण्यात आली.

या दरम्यान दादर सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र.१२ वर दोन संशयित तृतीयपंथी आढळून आले. त्यांना दादर आरपीएफ चौकीवर चौकशीसाठी आणण्यात आले. या चौकशीत त्यांनी माहीम आणि वांद्रे दरम्यान लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशाने पैशांची मागणी केल्यावर झालेल्या वादानंतर ही मारहाण केल्याची कबुली दिली.

Mumbai Local
Pilgrimage Development: राज्यातील तीन प्रमुख तीर्थक्षेत्रांसाठी 115 कोटींची मंजुरी; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

ही घटना मुंबई सेंट्रल शासकीय रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्याने, पुढील कारवाईसाठी त्या दोघांना जीआरपी मुंबई सेंट्रलकडे सोपवण्यात आले आहे. जीआरपी मुंबई सेंट्रलने भारतीय दंड संहितेच्या कलम ११५(२) अंतर्गत गुन्हा दाखल करून आवश्यक कारवाई केली आहे. दोन्ही तृतीयपंथी व्यक्तींनी आपल्या कृत्याबद्दल खेद व्यक्त केला आणि माफी मागितली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news