राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

परिवहनचे महासंचालक रामानंद आता नियोजन विभागात; अमिताभ गुप्तांकडे कारागृह
Transfers of Senior Police Officers in the State
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्याFile Photo

मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान आणि परिवहन विभागाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांची अपर पोलीस महासंचालक नियोजन व समन्वय या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती)प्रवीण साळुंके यांची अपर पोलीस महासंचालक (लोहमार्ग) या पदावर नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या जागी अपर पोलीस महासंचालक(कारागृह आणि सुधार सेवा) अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Transfers of Senior Police Officers in the State
अकराव्या जागेसाठी पवार काका-पुतण्यात खरी चुरस

अकराव्या जागेसाठी पवार काका-पुतण्यात खरी चुरसवैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक सुरेश मेखला यांची अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक दीपक पांडे यांची अमिताभ गुप्ता यांची पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान आणि परिवहन विभागाचे अपर पोलीस महासंचालक पदावर बदली करण्यात आली आहे.

Transfers of Senior Police Officers in the State
विराट कोहलीच्या 'वन 8 कम्युन'वर गुन्हा दाखल

नागपूर शहराच्या पोलीस सहआयुक्त अश्वती दोरजे यांची मुंबईत विशेष पोलिस महानिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण या पदावर बदली झाली आहे. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची विशेष पोलिस महानिरीक्षक(कायदा-सुव्यवस्था) या पदावर मुंबईत बदली झाली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक(गुन्हे अन्वेषण विभाग) पुणे येथे तैनात रंजन कुमार शर्मा यांची पुणे शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस सहआयुक्त पदी बदली झाली आहे. राज्य गुन्हे अभिलेख विभाग, गुन्हे अन्वेषण विभागाचे पुणे येथे तैनात विशेष पोलिस महानिरीक्षक डी.के.पाटील-भुजबळ यांची नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news