अकराव्या जागेसाठी पवार काका-पुतण्यात खरी चुरस

विधान परिषद निवडणूक : प्रत्येकी एक उमेदवार संकटात ?
As twelve candidates have entered the fray for the eleven seats of the Legislative Council, the colors have increased.
विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात उतरले असल्याने रंगत वाढली आहे. Legislative Council Elections
Published on
Updated on

मुंबई : विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात उतरले असल्याने रंगत वाढली असून नाराज आणि अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी जोरदार फिल्डींग आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूच्या नेत्यांनी लावली आहे. अजित पवार गटाचा दुसरा उमेदवार आणि शरद पवार पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील यांच्यात खर्‍या अर्थाने अकराव्या जागेसाठी चुरस होणार आहे.

अकरा जागांसाठी महायुतीत भाजप 5, शिवसेना शिंदे गट 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 2 असे 9 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजपकडे 103 आमदार आहेत तर त्यांच्यासोबत 10 अपक्ष आमदार आहेत. त्याचबरोबर 7 अपक्ष तसेच स्वाभिमानी पक्ष 1, मनसे 1 आणि जनसुराज्य शक्ती 1 अशी 113 मते भाजपकडे असल्याचे सध्या दिसत आहेत. त्यामुळे भाजपने आपल्या उमेदवारांना 23 मतांचा कोटा दिला तर त्यांचे उमेदवार निवडून येतील. बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार असून ते कोणाच्या बाजूने उभे राहणार हे गुलदस्त्यात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news