विराट कोहलीच्या 'वन 8 कम्युन'वर गुन्हा दाखल

कर्नाटक पोलिसांची कारवाई, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
'One 8 Commune' pub in Bangalore owned by Virat Kohli
विराट कोहलीच्या मालकीचा बेंगळुरूतील 'वन ८ कम्युन' पब file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकताच T20 विश्वचषक जिंकून परतलेल्या भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीच्या मालकीच्या पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे. कोहलीच्या बेंगळुरूतील 'वन ८ कम्युन' या पबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत पब सुरू ठेवल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

'One 8 Commune' pub in Bangalore owned by Virat Kohli
विराट कोहली-अनुष्का शर्मा जहीर खानसोबत डिनर पार्टीला (Video)

बेंगळुरू शहरात रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या अनेक पबच्या व्यवस्थापनाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. यापैकी एक पब विराट कोहलीच्या मालकीचा आहे. एमजी रोडवरील 'वन 8 कम्युन' हा पब विराट कोहलीचा आहे. रात्री मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर पोलिसांनी पब व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

बेंगळुरू पोलिसांचे डीसीपी सेंट्रलने सांगितले की, आम्ही तीन-चार पबवर कारवाई केली आहे. ज्यांनी पब पहाटे दीड वाजेपर्यंत उघडे ठेवल्याचा आरोप आहे. पबमध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याची तक्रार आम्हाला मिळाली होती. पब्स फक्त रात्री १ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे, त्यानंतर कोणतेही पब उघडे राहू शकत नाहीत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news