Tiger Shroff Shooting Case : "टायगर श्रॉफ हा टार्गेटवर नव्हताच..."; गोळीबार प्रकरणाच्‍या प्राथमिक तपासात मोठी माहिती आली समोर

टायगर श्रॉफसोबत पोलीस बंदोबस्त नसल्‍याची माहिती हल्लेखोरांना चाहत्यांच्या रील्सवरून मिळाली
Tiger Shroff Firing Case
Tiger Shroff Firing CasePudhari
Published on: 
Updated on: 

Tiger Shroff Shooting Case : बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे. मात्र, हल्लेखोरांच्या टार्गेटवर आधी टायगर श्रॉफ नव्हताच, असा धक्कादायक खुलासा पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत झाला आहे.

... त्यामुळे टायगर श्रॉफवर गोळीबार

आरोपी मुंबईत एका व्यक्तीला मारण्यासाठी आले होते. मात्र त्यांना ठरवलेल्या टार्गेटपर्यंत सहज पोहोचता आले नाही. यानंतर त्यांनी टायगर श्रॉफवर गोळीबार केला. कारण टायगर श्रॉफसोबत पोलीस बंदोबस्त नसतो, याची माहिती हल्लेखोरांना चाहत्यांच्या रील्सवरून मिळाली होती.

Tiger Shroff Firing Case
Tiger Shroff firing Case|मुंबई पोलिसांकडून टायगर श्रॉफला सुरक्षा!

बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा डाव

हल्लेखोरांचे टार्गेट वेगळीच व्यक्ती होती. मात्र संबंधित व्यक्तीसोबत असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे हा प्लॅन रद्द करावा लागला. यानंतर दोघांनी बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अभिनेता टायगर श्रॉफ याला थेट जीवे मारण्याचे ठरवले होते. टायगर श्रॉफ आणि त्याच्या चाहत्यांच्या इन्स्टाग्रामवरून हल्लेखोरांनी रेकी करत टायगर श्रॉफच्या मूव्हमेंट्स ट्रेस केल्या होत्या, असेही तपासात स्पष्ट झाले आहे.

Tiger Shroff Firing Case
Tiger Shroff Firing Case : अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ल्याचा दावा करणारा अनिल पंडित नक्की कोण आहे?

हल्ल्यानंतर अनिल पंडितने स्वीकारली होती जबाबदारी

मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर तिघांनी तीन राऊंड गोळ्या झाडल्या. यात टायगर थोडक्यात बचावला, पण त्याच्या चालकासह दोघे जखमी झाले. हल्ल्यानंतर अनिल पंडितची एक ऑडिओ क्लिप समोर आली असून त्याने चित्रपटसृष्टीला थेट आव्हान दिले आहे. अभिनेता सलमान खानसोबत काम करणाऱ्या कलाकारांना इशारा देताना तो म्हणाला, ‘सब का नंबर आयेगा’. याप्रकरणी कोटा येथून अटक करण्यात आलेले शूटर रेहान आणि हृतिक कुमार हे थेट अनिल पंडितच्या संपर्कात होते. प्राथमिक चौकशीनुसार, नेपाळमार्गे पळून जाण्याचा कट रचणाऱ्या या शूटर्सना अमेरिकेतून पंडितच दिशानिर्देश देत होता. हल्ल्यानंतर सोशल मीडियावर अनिल पंडित (अनमोल बिष्णोई या नावाने) जबाबदारी स्वीकारणारा संदेश प्रसारित करून ते अकाउंट लगेच डिलीट करण्यात आले.

Tiger Shroff Firing Case
Tiger Shroff Firing Case: तीन मालक, कागदपत्रांचा घोळ अन् गोळीबार! टायगर श्रॉफ प्रकरणात पल्सर बाईक जप्त; तपासात नवा खुलासा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news