Tiger Shroff Firing Case: हल्लेखोरांना पळून जाण्यास मदत करण्याचे आदेश अनिल पंडितचेच

दिल्ली आणि सोनीपतमधून कुणाल, सुमित, राधा आणि बबिता ताब्यात; शस्त्र पुरवठ्याची साखळी पंजाब ते मुंबईपर्यंत
Tiger Shroff Firing Case
Tiger Shroff Firing CasePudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे हल्लेखोर मुंबईत अडकले आहेत. त्‍यांची पळून जाण्याची व्यवस्था कर अशा सूचना या गोळीबाराचा संशयीत सूत्रधार व कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा हस्तक अनिल पंडितने दिल्लीत पकडलेल्या गेलेल्या कुणालला दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनीच ही माहिती मंगळवारी उघड केली.

मंगळवारी नवी दिल्लीत टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात महत्‍वची भूमिका बजावणारे कुणाल, सुमित, राधा आणि बबिता या चौघांना अटक झाली.

ज्या दिवशी टायगरवर गोळीबार झाला त्‍या १८ ऑक्टोबर रोजीच दिल्लीत पकडल्या गेलेल्या राधा आणि बबिता यांनी मुंबई सोडले होते. एका मुलाकडे पिस्तुल व काडतुसे देण्यासाठी त्‍या आलेल्या होत्‍या.

दादरहून हरिद्वार एक्स्प्रेसने दिल्लीच्या दिशेने त्‍यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. मात्र मंगळवारी २० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर या दोघींना ताब्यात घेण्यात आले. कुणाल आणि सुमित यांना हरियाणातील सोनीपत येथून ताब्यात घेण्यात आले.

Tiger Shroff Firing Case
Goregaon Child Case: १८ महिन्यांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून फेकून दिले; गोरेगावच्या दहा वर्षांच्या मुलीविरुद्ध गुन्हा दाखल

दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने चौघांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(१)(ब) अंतर्गत न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या सीआयडी पथकाने चौघांची कोठडीत चौकशी करून औपचारिक अटकेची परवानगी मागितली. न्यायालयाने ती मंजूर केली. पुढे मुंबई पोलिसांनी तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी केली असता न्यायालयाने तीही मंजूर केली.

पंजाब ते मुंबई व्हाया दिल्ली

शस्त्र पुरवठ्याची साखळी पंजाबातून सुरू होते आणि व्हाया दिल्ली ती मुंबईत पोहोचते. या सर्व हालचाली अनिल पंडितच्या इशार्‍यावर झाल्याचेही आतापर्यंतच्या तपासावरून स्पष्ट होत आहे. मात्र गोळीबार करण्यासाठी तिघे शुटर्स मुंबईत आधीच पोहोचलेले होते, तर दादरमध्ये लहान मुलाच्या हाती पिस्तुल, काडतुसांची बॅग देण्यामागे काय डाव होता हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.

Tiger Shroff Firing Case
Mumbai Electronics Shopping: दसऱ्याला इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा उत्साह! दर ८ टक्क्यांनी वाढले, तरी बाजारात गर्दी

गोळीबारानंतर हल्लेखोरांना पळून जाण्यास मदत करण्यासाठी कोणती व्यवस्था करण्यात आली होती, याचाही तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news