Mumbai Electronics Shopping: दसऱ्याला इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा उत्साह! दर ८ टक्क्यांनी वाढले, तरी बाजारात गर्दी

स्मार्ट टीव्ही फ्रिज वॉशिंग मशीन आणि एसी खरेदीला पसंती; दरवाढीनंतरही ग्राहकांनी साधला दसऱ्याचा मुहूर्त
Mumbai Electronics Shopping
Mumbai Electronics ShoppingPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घरगुती इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक वस्तुंची खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी इलेक्ट्रॉनिक्स बाजारात मंगळवारी धाव घेतली.

विशेष म्हणजे काही दिवसांपासून इलेक्ट्रिकल वस्तूंच्या दरात सुमारे ७ ते ८ टक्के वाढ झाली आहे. तरी दसऱ्याचा मुहूर्त साधण्यासाठी बाजारात मुंबईकरांची गर्दी होती. यामध्ये स्मार्ट टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, एसी खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक होता.

Mumbai Electronics Shopping
Thane Coastal Road Project: ठाणे किनारी मार्गासाठी १० आय-गर्डर्सची एकाच दिवशी उभारणी

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक घरी आणता यावी म्हणून अनेक नागरिकांनी आधीच बुकिंग करून ठेवल्या होत्या. काल या वस्तू घरी घेऊन जाण्यासाठी मुंबईतील काळबादेवी, ग्रँटरोडच्या लॅमिंग्टन रोड तसेच दादर, माहीम येथील एलजी, विजय सेल शॉपमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती.

विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांत इलेक्ट्रिकल वस्तूंच्या दरात सुमारे ७ ते ८ टक्के वाढ झाली आहे. त्यात उकाडा वाढत असल्याने एसी आणि फ्रिजच्या किंमती वाढल्या आहेत. अशात दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहक वस्तू खरेदीसाठी येतील का, याबाबत व्यापारामध्ये धाकधूक होती. मात्र, ग्राहकांचा कल खरेदीकडे वाढल्याने इलेक्ट्रॉनिक्स बाजारात आनंदाचे वातावरण असल्याचे माहीम येथील एका एसी फ्रीज विक्रेत्याने सांगितले.

Mumbai Electronics Shopping
Ramdas Kadam: जरांगे यांच्या संपत्तीची चौकशी करा; रामदास कदम यांची मागणी

यामध्ये स्मार्ट टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, एसी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. ब्रॅण्डेड कंपनीचा साधारण ५ स्टार एसी २८ ते ३० हजारावरून ३५ ते ४० हजारापर्यत विकला जात होता. तर १० ते १५ हजारात मिळणारा फ्रीझ १६ ते २५ हजारावर आहे. मात्र ही घरगुती गरजेची वस्तू असल्याने ग्राहक ते घेत असल्याचे दादर येथील एका विक्रेत्याचे म्हणणे आहे.

उकाडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अशात फ्रिज आणि एसी घरात असणे गरजेचे झाले आहे. मात्र इलेक्ट्रिकल वस्तूंच्या दरात सुमारे ७ ते ८ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना या विकत घेणे आर्थिकदृष्ट्या जड जात आहे. तेव्हा सरकारने दुष्काळ आणि वाढता उकडा लक्षात घेत इलेक्ट्रिकल वस्तूंवरील वाढ कमी करावी.

- शेफाली मठकर, एक ग्राहक माहीम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news