Tiger Shroff Firing Case : टायगर गोळीबारातील अमनला सोनीपतमधून अटक

११ आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ; मकोकाअंतर्गत पुन्हा अटकेची कारवाई
Tiger Shroff Firing Case
Tiger Shroff Firing CasePudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ याच्या जुहू येथील कारवरील गोळीबार प्रकरणाच्या तपासात मुंबई गुन्हे शाखेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने हरियाणातील सोनीपत येथे जाऊन अमन नावाच्या संशयिताला ताब्यात घेतले. ही कारवाई सोनीपत पोलिसांच्या मदतीने करण्यात आली.

गोळीबार प्रकरणाच्या तपासादरम्यान मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यानी सांगितले. अमनची या प्रकरणातील नेमकी भूमिका काय आहे, तसेच त्याचा गोळीबार करणारे आरोपी आणि शस्त्रपुरवठा करणाऱ्या संशयितांशी काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे.

Tiger Shroff Firing Case
Pradeep Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या अटकेसाठी ठाकरे विरुध्द शिंदे

दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणातील ११ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू केल्यानंतर विशेष मकोका न्यायालयाने गुरुवारी सर्व आरोपींना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. हल्ल्यामागील कथित कटाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.

या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये फूलसिंग, रेहान अन्सारी, ऋतिक महतो, राधा वर्मा, बबिता राव, कुणाल जमिनसिंग, सुमित सरोलिया, सरपंच खटक ऊर्फ अंकित, समीर खत्री, जतिन पांचाळ आणि प्रांजल ठकरान यांचा समावेश आहे.

Tiger Shroff Firing Case
Beed News : मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू

आरोपींना पुन्हा अटक

गुन्हे शाखेने सक्षम प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी मकोकाची कलमे गुन्ह्यात समाविष्ट केली. त्यानंतर विशेष न्यायालयाने परवानगी दिल्यावर २८ ऑक्टोबर रोजी सर्व ११ आरोपींना मकोकाअंतर्गत पुन्हा अटक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्यांना विशेष न्यायाधीश सत्यनारायण रामजीवन नवंदर यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.