Beed News : मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार : चौकशीसाठी समिती नियुक्त
Beed News
Beed News : मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधूfile photo
Published on: 
Updated on: 

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेल्या चार रुग्णांची दृष्टी अधू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. १७ ऑक्टोबर रोजी या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Beed News
Beed Crime : अक्षरांची बनवाबनवी करत सुनील बन झाला डॉक्टर !

शस्त्रक्रियेनंतर जंतुसंसर्ग झाल्याचे आढळल्यानंतरही उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने रुग्णांना पुढील उपचारांसाठी जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची चौकशी करण्यासाठी शंकर धपाटे यांनी दिली. सात सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या नेत्रशस्त्रक्रिया विभागात एक दिवसाआड शस्त्रक्रिया केल्या जातात.

१७ ऑक्टोबर रोजी एकूण २२ रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्याच दिवशी सायंकाळी करण्यात आलेल्या तपासणीत यापैकी चार रुग्णांना जंतुसंसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने उपचार सुरू केले. तसेच लातूर येथून तज्ज्ञांना बोलावून रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले.

या चारही रुग्णांना पुढील उपचारांसाठी जालना येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर मात्र, उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. जंतुसंसर्गामुळे या रुग्णांची दृष्टी अधू झाल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Beed News
Kaij Kidnapping Case | केज तालुक्यात सालगड्याच्या २१ वर्षीय मुलीचे अपहरण

या प्रकरणाची नेमकी कारणे काय, शस्त्रक्रियेदान्यान किंवा त्यानंतर संसर्ग कसा झाला आणि उपचार प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या का, याची चौकशी आता समितीमार्फत केली जाणार आहे. सात सदस्यीय समितीच्या चौकशीतून या घटनेमागील वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. रुग्णांच्या दृष्टीला झालेल्या नुकसानीचे नेमके स्वरूप आणि त्याबाबतची जबाबदारी चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.

अद्याप नजरेत सुधारणा नाही; विभागप्रमुखांचा खुलासा १७ ऑक्टोबर रोजी बावीस रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. यातील अठरा रुग्ण ठणठणीत आहेत, तर चार रुग्णांना दुसऱ्या दिवशी तपासणी करत असतांना त्रास होत असल्याचे लक्षात आले. यानंतर आम्ही आवश्यक तो औषधोपचार देखील केला. तसेच अधिक उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर बोलावले होते. त्यांनी या चार रुग्णांवर उपचार करुन अधिक उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दि. २५ ऑक्टोबरपर्यंत त्यांच्यावर तेथे उपचार करण्यात आले. दि. २८ रोजी अंबाजोगाईत पुन्हा तपासणी करण्यात आली. परंतु अद्याप या रुग्णांच्या नजरेत फारशी सुधारणा झाल्याचे दिसत नाही.
- डॉ. ज्ञानोबा दराडे, नेत्र शस्त्रक्रिया विभागप्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.