

कांदिवली: कांदिवलीत महापालिकेकडून अतिक्रमणांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे. पश्चिमेतील 90 फूट रोडवरील 40 पेक्षाअधिक दुकानांची वाढीव बांधकामे गुरुवारी पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. मात्र दुकानादार आणि व्यवसायिकांनी पदपथ तसेच वाढीव बांधकाम करून शेड, बोर्ड, फलक, जाहिराती फलक तसेच लोखंडी शिड्या बाहेर काढल्या होत्या. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत असल्याने वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे महापालिकेने गुरुवारी ही वाढीव बांधकामे हटवण्यात आली.
प्रशासनाने नियमानुसार कारवाई केली आहे. रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करणे, पादचाऱ्यांसाठी मोकळी जागा उपलब्ध करून देणे आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण हटवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र कारवाईमुळे काही दुकानदारांनी तीवॅ नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांसह प्रवाशांनी कारवाईचे स्वागत केले.