ICICI Bank loan fraud case : वेणुगोपाल धूत यांच्या याचिकेवरील निर्णय मुंबई हायकोर्टाने राखून ठेवला

ICICI Bank loan fraud case : वेणुगोपाल धूत यांच्या याचिकेवरील निर्णय मुंबई हायकोर्टाने राखून ठेवला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीआयसीआय- व्हिडिओकॉन बँक कर्ज प्रकरणात (ICICI Bank loan fraud case) सीबीआयने व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना अटक केली आहे. या अटकेला आव्हान देणारी रिट याचिका धूत यांनी दाखल केली आहे. दरम्यान, या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे.

या प्रकरणात (ICICI Bank loan fraud case)  आयसीआयसीआयच्या माजी सीईओ चंदा कोचर यांची भायखळा तुरुंगातून आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची ९ जानेवारी रोजी आर्थर रोड तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने कोचर यांना जामीन मंजूर करताना अटक कायद्यानुसार नाही, असे निरीक्षण नोंदवले होते.

न्यायालयाने सीबीआयला फटकारले

कोचर दाम्पत्याला 23 डिसेंबर 2022 रोजी सीबीआयने अटक केली होती. दोघांनीही अटकेला बेकायदेशीर आणि मनमानी ठरवून उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती.

चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेतील उच्चपदावर असतानाच्या काळात व्हिडिओकॉन कंपनीला नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करण्यात आले होते. व्हिडिओकॉनला कर्ज देणाऱ्या बॅंकेच्या समितीत चंदा कोचर यांचा समावेश होता. कर्ज वाटप करण्याच्या बदल्यात व्हिडिओकॉनने चंदा कोचर यांच्या पतीच्या न्यू रिन्यूएबल नावाच्या कंपनीत ६४ कोटींची गुंतवणूक केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. न्यू रिन्यूएबलमध्ये दीपक कोचर यांची ५० टक्क्यांची हिस्सेदारी आहे. विशेष म्हणजे याआधी सप्टेंबर २०२० मध्ये ईडीने दीपक कोचर यांना अटक केली होती.

तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तच्या कर्ज वाटप घोटाळाप्रकरणी ईडीने याआधी चंदा कोचर यांच्यावर हवालाचा गुन्हाही दाखल केला होता. तर वेणूगोपाल धूत यांच्याविरोधात सीबीआयने २०१९ साली गुन्हा दाखल केला होता. मुख्य आरोपींमध्ये सामील असलेल्या कोचर दांपत्याला सीबीआयने अटक केली होती.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news