‘रॅपिडो’ला हायकोर्टाचा मोठा दणका; सर्व सेवा आज दुपारी एक वाजेपासून सरसकट बंद करण्याचे आदेश | पुढारी

'रॅपिडो'ला हायकोर्टाचा मोठा दणका; सर्व सेवा आज दुपारी एक वाजेपासून सरसकट बंद करण्याचे आदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यभरात बेकायदेशीररित्या सुरू असलेली रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा दुपारी दीड वाजान्याच्या आत बंद करा असे कडक आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी रॅपिडो बाईक टॅक्सी कंपनीला दिले. रॅपिडो बाईक टॅक्सीला एग्रीकेटर परवाना मिळावा, या करिता बाईक टॅक्सी राज्य परिवहन विभागाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेली होती.

गेली अनेक दिवसापासून रॅपिडो प्रकरण न्यायालयात होते. शुक्रवारी दुपारी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी राज्य परिवहन विभागाने आपली बाजू मांडत रॅपिडोची अनधिकृतरित्या बाईक टॅक्सी सेवा सुरू असल्याचे न्यायालयासमोर मांडले. त्यामुळे न्यायालयाने कंपनीला फटकारत आपली सेवा पुढील सुनावणीपर्यंत तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

Back to top button