विरोधी पक्षात असताना आम्ही दररोज राजभवनावर येत नव्हतो ; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

विरोधी पक्षात असताना आम्ही दररोज राजभवनावर येत नव्हतो ; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
Published on
Updated on

मुंबई, पुढारी ऑनलाईन : मुंबईतील राजभवन येथे दरबार हॉलचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी रोजी पार पडले. या कार्यक्रमाला रामनाथ कोविंद याच्यांसोबत श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच निवडक मंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमात 'विरोधी पक्षात असताना आम्ही दररोज राजभवनावर येत नव्हतो' असा टोला विरोधकांच्या उपस्थितीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ८ डिसेंबर २०२१ रोजी नव्या दरबार हॉलचे उदघाटन होणार होते. पण तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या आकस्मिक निधनामुळे उदघाटन सोहळा स्थगित करण्यात आला. यानंतर आता आज शुक्रवारी (दि. ११) रोजी राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उदघाटन पार पडले. या कार्यक्रमाला श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि अनेक मंत्र्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या उपस्थितीवरुन जोरदार टोला लगावला.

याच दरम्यान ठाकरे यांनी नुतनीकरण केलेल्या ऐतिहासिक वास्तूचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री म्हणून आनंद होत आहे. राजभवन, दरबार हॉल आमच्यासाठी नवीन नाही. विरोधी पक्षात असताना आम्ही रोज राजभवनात येत नसून एखाद दुसऱ्या वेळी येथे येत होतो. याच दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून आमच्या व्यथा मांडत होतो. आजही आम्हाला आवश्यकता असते तेव्हा आम्ही त्यांना भेटण्यास जात असतो. त्याच्या संपर्कात राहत असतो.' असे त्यांनी म्हटले आहे.

दरबार हॉलच्या उद्घाटनात पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, 'या वास्तूने अनेक घटना अनुभवल्या आहेत. ३० एप्रिल १९६० रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण केले होते त्याचा मला अभिमान आहे. या वास्तूच्या नुतनीकरणात ज्या-ज्या लोकांनी हातभार लावले त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. हे राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन बनेल अशी माझी आशा आहे. या राजभवनात साप आणि मोरही आढळून येतात. अशी वास्तू शोधूनही सापडणार नाही. आधुनिकीकरणाच्या नावाखाली जुने तोडून नविन वास्तू उभी करतो. परंतु, त्याचवेळी आपली संस्कृतीसुद्धा जपणे आव्हानात्मक असते.' असेही ते म्हणाले.

अशा आहे नवा दरबार हॉल

दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला आहे. या दरबाराची आसन क्षमता ७५० इतकी आहे. जुन्या हॉलची आसन क्षमता २२५ इतकी होती. नव्या सभागृहाला बाल्कनी आणि समुद्र दर्शन घडविणारी गॅलरी उभारण्यात आली आहे. ( दररोज राजभवनावर येत नव्हतो )

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news