Mumbai Local| हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढला; प्रवाशांचा प्रवास जलद

टिळकनगर-पनवेलदरम्यान लोकल धावणार ताशी 95 किलोमीटरच्या वेगाने; प्रवाशांना दिलासा
The journey between CSMT and Panvel has become faster
सीएसएमटी ते पनवेलदरम्यानचा प्रवास वेगवानFile photo
Published on
Updated on

हार्बर मार्गावरील प्रवाशांकरिता आनंदाची बातमी आहे. हार्बर मार्गावरील टिळकनगर ते पनवेलदरम्यान लोकल 80 किमी प्रतितासवरून 95 किमी प्रतितास धावत आहे. यामुळे सीएसएमटी ते पनवेलदरम्यान प्रवासाचा वेळ 2 ते 3 मिनिटांनी कमी झाला आहे.

The journey between CSMT and Panvel has become faster
Frank Duckworth : डकवर्थ-लुईस नियमाचे सहनिर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन

सीएसएमटी ते पनवेलदरम्यानचा प्रवास वेगवान

सीएसएमटी ते पनवेलदरम्यानचा प्रवास काहीसा वेगवान झाला आहे. सध्या सीएसएमटी ते पनवेलदरम्यान सध्या ताशी 80 किमी वेगाने लोकल धावतात. या वेगाने सीएसएमटी ते पनवेल अंतर पार करण्यासाठी 80 मिनिटे म्हणजेच एक तास 20 मिनिटे लागतात.

हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास वेळ वाचवण्यासाठी लोकलचा वेग वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने गेल्या वर्षी घेतला होता. त्यानुसार आता हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढविण्यात आला आहे.

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल 188 आणि सीएसएमटी ते बेलापूर 79 लोकलच्या फेर्‍या दिवसभरात होतात.यातून सुमारे 20 ते 25 लाख प्रवासी प्रवास करतात.

The journey between CSMT and Panvel has become faster
सांगली : भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासो सुर्यवंशी यांचे निधन

यामुळे वेग वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता.

हार्बर मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी पीक अवरच्या वेळी लोकलला प्रचंड गर्दी असते. परंतु हार्बर मार्गावर केवळ धीम्या मार्गावरील लोकल धावतात.त्यामुळे गाड्यांना गर्दी असते. त्यातच हार्बर मार्गावरील गाड्यांचा वेग कमी असल्याने प्रवाशांना नेहमीच लेटमार्क लागतो. यामुळे हार्बर मार्गावरील वेग वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता.

सीएसएमटी-टिळकनगर दरम्यानच्या दर दोन स्थानकांमधील अंतर 1 ते 2 किमी आहे. त्यामुळे प्रत्येक स्थानकात लोकल थांबवून पुन्हा वेग कमी-जास्त करावा लागतो. मात्र टिळकनगर स्थानकानंतर दोन स्थानकांतील अंतर वाढते. त्यामुळे टिळकनगर ते पनवेल या 32.53 किमी मार्गात लोकलचा वेग वाढविला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news