सांगली : भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासो सुर्यवंशी यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासो सुर्यवंशी यांचे निधन
Senior BJP leader Babaso Suryavanshi passed away
भाजपचे जेष्ठ नेते बाबासो सुर्यवंशी यांचे निधनFile Photo

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र बुरुड समाज संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते बाबासाहेब विष्णू सुर्यवंशी (वय ७५) यांचे आज (बुधवार) पहाटे निधन झाले. ते दीनदयाळ मागासवर्गीय सूतगिरणीचे माजी अध्यक्ष तसेच इस्लामपूर नगरपालीकेचे माजी नगरसेवक होते.

पालिकेते अनेक वर्षे ते विरोधी पक्षनेतेही होते. तालुक्यासह जिल्ह्यात भाजप पक्ष वाढविण्यासाठी त्यांचे योगदान होते. शहरातील नागरी प्रश्नांवर मोर्चे काढून आवाज उठविण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परीवार आहे. अंत्यविधी सकाळी ९ वाजता येथील कापूसखेड नाका स्मशानभूमीत होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news