Mumbai vegetarian house ad : ‘मांसाहारींना घर नाही!’ ताडदेवमधील जाहिरातीवरून वाद

ताडदेव येथील घराच्या जाहिरातीची ‘महारेरा’कडे तक्रार
Mumbai vegetarian house ad
Mumbai vegetarian house adpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : 'मांसाहारी असाल तर इथे घर मिळणार नाही. शुद्ध शाकाहारी असाल तर तुमचे स्वागत आहे', अशा वाक्यांमुळे ताडदेव येथील एका घराची जाहिरात वादात सापडली आहे. या जाहिरातीवर तत्काळ बंदी आणावी, अशी मागणी करणारी तक्रार महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे (महारेरा) दाखल करण्यात आली आहे.

मुंबईत विलेपार्ले, घाटकोपर, इत्यादी विविध ठिकाणी मांसाहारी कुटुंबांना शाकाहारी कुटुंबाकडून घरे नाकारण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांमधील आहारस्वातंत्र्य हा कायमच वादाचा मुद्दा असतो. बऱ्याचदा अशा घटनांना मराठी विरूद्ध अमराठी असा रंग मिळतो. ताडदेव येथील घराच्या जाहिरातीमुळे पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे.

Mumbai vegetarian house ad
MMRDA Mumbai One app : ‘मुंबई वन’ ॲपवरून १ कोटी तिकिटांची विक्री

भावेश कावरे यांच्या प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन गुरू या इन्स्टाग्राम खात्यावरून एक रील प्रक्षेपित करण्यात आले आहे. ताडदेव येथील ६.३० कोटी किंमतीच्या २ बीएचके सदनिकेची ही जाहिरात आहे. जाहिरातीच्या सुरुवातीलाच भावेश सांगतात की, 'मांसाहारी असाल तर इथे घर मिळणार नाही. शुद्ध शाकाहारी असाल तर तुमचे स्वागत आहे'. जाहिरातीच्या शेवटीही ते याचा पुनरुच्चार करतात. या जाहिरातीविरोधात मराठी एकीकरण समितीचे प्रतिनिधी आनंदा पाटील यांनी आपले सरकार तक्रार नोंद प्रणालीच्या माध्यमातून महारेराकडे तक्रार केली आहे.

तक्रारदारांचे म्हणणे...

अन्न, राहणीमान, धर्म किंवा इतर कोणत्याही कारणावरून घर खरेदीत भेदभाव करणे हे संविधानाच्या अनुच्छेद १४, १५ व २१ चे उल्लंघन आहे. तसेच रेरा कायद्याच्या तरतुदींनुसारदेखील ही बेकायदेशीर प्रथा आहे. महारेराने संबंधित प्रकल्पाच्या जाहिरातीवर तत्काळ बंदी घालावी. विकासक व जाहिरातदारांवर दंडात्मक कारवाई करावी आणि सर्व नागरिकांना समान हक्काने घर खरेदीचा अधिकार मिळावा यासाठी धोरणात्मक परिपत्रक प्रसिद्ध करावे.

Mumbai vegetarian house ad
Santacruz Chembur Link Road expansion : सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तारीकरणाचे लोकार्पण; चेंबूर मेट्रो स्थानकही सेवेत

शाकाहारी व्यक्तीलाच घर विकायचे आहे, हा मालकाचाच निकष आहे. मालक स्वत: वारकरी आहे आणि तो स्वत: मांसाहार करत नाही. कोणत्याही मांसाहारी व्यक्तीला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागतो. व्हिडिओमध्ये मी कोणत्याही समाजाचा उल्लेख केलेला नाही, असे भावेश कावरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news