MMRDA Mumbai One app : ‘मुंबई वन’ ॲपवरून १ कोटी तिकिटांची विक्री

८ लाख १६ हजार ४०२ जणांनी ॲॅप डाउनलोड केले
MMRDA Mumbai One app
मुंबईत लोकलपासून बेस्ट आणि मेट्रोपर्यंत तिकीट काढायचे तर मुंबई वन हे एक ॲप पुरेसे आहे. pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) विकसित केलेल्या ‘मुंबई वन’ या सामायिक दळणवळण ॲपने एकूण १ कोटी तिकीट व्यवहारांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी या ॲपद्वारे आतापर्यंत १ कोटी ४ लाख ११ हजार ८२४ तिकिटे बुक करण्यात आली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘मुंबई वन’ ॲपचे लोकार्पण करण्यात आले होते. मुंबई महानगर प्रदेशातील विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकाच डिजिटल व्यासपीठावर आणून लाखो प्रवाशांचा विविध वाहतूक साधनांद्वारे होणारा प्रवास अधिक सोपा करण्याच्या उद्देशाने ‘मुंबई वन’ची निर्मिती करण्यात आली आहे.

MMRDA Mumbai One app
Santacruz Chembur Link Road expansion : सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तारीकरणाचे लोकार्पण; चेंबूर मेट्रो स्थानकही सेवेत

लोकार्पणानंतर अवघ्या १० महिन्यांत या ॲॅपवरून एक कोटी तिकिटांची खरेदी प्रवाशांनी केली आहे. तसेच ८ लाख १६ हजार ४०२ जणांनी हे ॲॅप डाउनलोड केले आहे. एकूण डाउनलोड्सपैकी ७४ टक्के ॲॅण्ड्रॉइड तर, २६ टक्के आयओएस वापरकर्ते आहेत.

तिकीट व्यवहारांची आकडेवारी पाहता मुंबईच्या वेगाने विस्तारत असलेल्या मेट्रो नेटवर्कमध्ये ‘मुंबई वन’ ॲपचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार होत असल्याचे दिसते. मेट्रो मार्गिका २अ, ७, २ब आणि ९ यांच्यासाठी एकत्रितपणे सर्वाधिक ३० लाख १० हजार ५५४ तिकिटे बुक करण्यात आली आहेत. त्याखालोखाल मेट्रो मार्गिका- १ साठी २८ लाख ४७ हजार ६८२, तर मेट्रो मार्गिका-३ साठी २४ लाख ३० हजार ३७० तिकिटे बुक करण्यात आली आहेत.

‘मुंबई वन’ ॲपद्वारे एकूण ८२,८८,६०६ तिकिटे बुक करण्यात आली असून, ‘मुंबई वन’वरील एकूण तिकीट व्यवहारांपैकी हे प्रमाण जवळपास ८० टक्के आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी १५,७०,९०६ तिकिटे बुक करण्यात आली आहेत.

MMRDA Mumbai One app
Pune Industrial News: चाकण येथील उद्योजकांसोबत उद्योगमंत्री घेणार बैठक

कोणत्या सेवेसाठी किती तिकिटे ?

मेट्रो मार्गिका २अ, ७, २ब आणि ९ -३०,१०,५५४

मेट्रो मार्गिका १ - २८,४७,६८२

मेट्रो मार्गिका ३ -२४,३०,३७०

नवी मुंबई मेट्रो मार्गिका १ - ३,३८,७१८

बेस्ट -१,५३,३२३

टीएमटी -३३,७०६

एनएमएमटी -१६,६९८

एमबीएमटी - ७,५५३

केडीएमटी-२,३१४

अवघ्या १० महिन्यांत गाठलेला एक कोटी तिकिटांचा हा टप्पा सर्वप्रथम ‘मुंबई वन’चा स्वीकार करणाऱ्या प्रवाशांचा आहे. या उपक्रमावर विश्वास दाखवल्याबद्दल मी सर्व प्रवाशांचे आभार मानतो. विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधून होणारा प्रवास एका प्लॅटफॉर्मद्वारे अधिक सोपा करणे, हा आमचा उद्देश होता. मिळालेला प्रतिसाद दर्शवतो की प्रवासी एकात्मिक आणि डिजिटल मोबिलिटीसाठी सज्ज आहेत.

डॉ. संजय मुखर्जी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news