Swabhimaan Project Adani Foundation: डॉ. प्रीती अदानींच्या नेतृत्वात स्वाभिमान प्रकल्पाचा राष्ट्रीय विस्तार

10 लाख महिलांना उद्योजक बनवण्याचा संकल्प
Swabhimaan Project Adani Foundation: डॉ. प्रीती अदानींच्या नेतृत्वात स्वाभिमान प्रकल्पाचा राष्ट्रीय विस्तार
Swabhimaan Project Adani Foundation: डॉ. प्रीती अदानींच्या नेतृत्वात स्वाभिमान प्रकल्पाचा राष्ट्रीय विस्तारPudhari
Published on
Updated on

मुंबई : महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठी झेप घेत, अदानी फाऊंडेशनने आपल्या स्वाभिमान नावाच्या प्रमुख उपक्रमाच्या व्यापक विस्ताराची घोषणा केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे देशभरातील 10 लाख महिला उद्योजिकांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अदानी फाऊंडेशनच्या आगामी 30 व्या वर्धापन दिनाचे (11 ऑगस्ट 2026) औचित्य साधून हा संकल्प करण्यात आला आहे.

मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस्‌‍ (छउझअ) येथे आयोजित स्वाभिमान-‌‘ढहश ठळीश ेष डहश‌’ या विशेष सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात महिलांची उपजीविका, उद्योजकता आणि आर्थिक स्वावलंबनावर या उपक्रमाचा झालेला सकारात्मक परिणाम अधोरेखित करण्यात आला.

Swabhimaan Project Adani Foundation: डॉ. प्रीती अदानींच्या नेतृत्वात स्वाभिमान प्रकल्पाचा राष्ट्रीय विस्तार
Honours Degree NEP: नव्या शैक्षणिक वर्षापासून ‌‘ऑनर्स‌’चा मार्ग खुला

महाराष्ट्रावर विशेष लक्ष

विस्ताराचा पहिला टप्पा महाराष्ट्रकेंद्रित असून, पहिल्या वर्षात राज्यातील 1 लाख महिलांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारच्या महिला आर्थिक विकास महामंडळ (चअतखच) यांच्या सोबतीने ‌‘सार्वजनिक-खासगी भागीदारी‌’ (झझझ) मॉडेलद्वारे राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईतील वंचित समुदायातील 4,500 हून अधिक महिलांना कौशल्य प्रशिक्षण आणि डिजिटल साक्षरतेद्वारे आधीच स्वावलंबी बनवण्यात आले असून, त्यापैकी 800 हून अधिक महिला लखपती दीदी बनल्या आहेत.

कार्यक्रमाला अदानी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदानी आणि विश्वस्त श्रीमती शिलिन अदानी उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत राज्याच्या महिला व बालविकासमंत्री श्रीमती आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे आणि एमएव्हीआयएमच्या एमडी नंदिनी आवाडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका संदेशाद्वारे अदानी फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचे अभिनंदन केले. मंत्री आदिती तटकरे यांनी नमूद केले की, स्वाभिमान हा उपक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला पूरक असून, महिलांसाठी शाश्वत संधी निर्माण करणारा एक आदर्श आहे.

Swabhimaan Project Adani Foundation: डॉ. प्रीती अदानींच्या नेतृत्वात स्वाभिमान प्रकल्पाचा राष्ट्रीय विस्तार
BMC Budget 2026 | मुंबई महानगरपालिकेचा ८० हजार ९५२ कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर

स्वतेजा मार्ट आणि क्लाऊड किचनचे उद्घाटन

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्वतेजा मार्ट या महिला-नेतृत्वाखालील बाजारपेठेचे उद्घाटन करण्यात आले. हे व्यासपीठ स्थानिक महिला उद्योजकांना त्यांची उत्पादने ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देते. तसेच, महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी क्लाऊड किचन सुविधेचेही अनावरण करण्यात आले. यासोबतच, स्वाभिमान उपक्रमातून यश मिळवलेल्या महिलांच्या प्रेरणादायी कथा असलेले एक कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आले.

Swabhimaan Project Adani Foundation: डॉ. प्रीती अदानींच्या नेतृत्वात स्वाभिमान प्रकल्पाचा राष्ट्रीय विस्तार
Divyang Empowerment Maharashtra: दिव्यांग कल्याण विभागाचे ‘दिव्यांग सक्षमीकरण विभागात’ रूपांतर; 172 नवी पदे मंजूर

डॉ. प्रीती अदानी यांचे विचार कार्यक्रमात बोलताना डॉ. प्रीती अदानी म्हणाल्या की, महिलांचे सक्षमीकरण हाच समुदाय बळकट करण्याचा आणि स्थानिक अर्थव्यवस्था सावरण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. मुंबईतील महिलांचा प्रवास पाहून आम्हाला आत्मविश्वास मिळाला आहे. आता आम्ही हा उपक्रम राष्ट्रीयस्तरावर नेऊन 10 लाख महिलांना उद्योजक, समुदाय नेते आणि आर्थिक विकासाचे चालक बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत.

अदानी फाऊंडेशनचा आवाका ः अदानी फाऊंडेशन सध्या भारतातील 22 राज्यांतील 7,000 हून अधिक गावांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि शाश्वत उपजीविकेवर काम करत आहे. स्वाभिमानचा हा विस्तार संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी (णछ डऊॠी) सुसंगत असून, तो भारताच्या राष्ट्रीय विकास प्राधान्यक्रमांना बळ देणारा ठरेल.

Swabhimaan Project Adani Foundation: डॉ. प्रीती अदानींच्या नेतृत्वात स्वाभिमान प्रकल्पाचा राष्ट्रीय विस्तार
Asiatic Society Election: एशियाटिक सोसायटी निवडणूक स्थगितीवर वाद; ‘अदृश्य हात’ असल्याचा कुमार केतकरांचा आरोप

हा उपक्रम केवळ महिलांना कौशल्य देत नाही, तर त्यांना स्वतःचे सूक्ष्म-उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि बाजारपेठेशी जोडणी करून देतो, ज्यामुळे घराघरांतील उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news