

Supriya Sule Social Media Post: दिल्लीतील संसंदेत परिसीमन विधेयक पुन्हा सादर करण्याच्या हालचाली सुरू आहे. यासाठी विशेष अधिवेशन देखील बोलवण्यात आलं आहे. आधी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने परिसीमन विधेयकाला विरोध केला होता. त्या एनसीपीने आता या विधेयकाला पाठिंबा देणार असे सुतोवाच दिले आहेत.
राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद आणि राज्यातील काही नेत्यांना राज्यात मंत्रीपद अशी डील झाल्याचे अनेक जाणकार सांगत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आज एक सुचक पोस्ट केली.
विशेष म्हणजे या फोटोत पवार कुटुंबाची पुढची फळी अर्थात जय पवार, पार्थ पवार, अभिमन्यु पवार आणि रोहित पवार देखील नाहीयेत.
सुप्रिया सुळे आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहितात की, 'प्रिय दादा, तुझी उणीव संपूर्ण कुटुंबाला प्रत्येक क्षणी जाणवत आहे. तुझ्यासोबत घालवलेले निखळ आनंदाचे क्षण कायम आमच्यासोबत आहेत. या आठवणी कायम आमच्या ह्रदयात राहतील'
इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता प्रिय दादा म्हणत ही पोस्ट केली आहे. त्यापूर्वी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला असल्याचे वक्तव्य करत हा पक्ष सत्तेशिवाय जगू शकत नाही अशी टोकाची टीका केली आहे.