Sunil Tatkare On Cash Video: महेंद्र थोरवे थोर विचारवंत... NIA मार्फत चौकशी करा.. सुनिल तटकरे त्या व्हिडिओवर स्पष्टच बोलले

माझ्यावर आरोप करणारे महान राष्ट्रभक्त आहेत. तटकरेंचा टोला
Sunil Tatkare Mahendra Thorve
Sunil Tatkare Mahendra Thorve PUDHARI PHOTO
Published on
Updated on
Summary
  • कॅश बॉम्ब व्हिडिओवर सुनिल तटकरेंचे वक्तव्य

  • महेंद्र थोरवेंना चिमटा काढत तपास करण्याची केली मागणी

  • महायुती अन् भाजपच्या वागणुकीबाबतही केलं भाष्य

Sunil Tatkare On Cash Video: शिवसेनेचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करून कॅश बॉम्ब फोडला होता. हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच हा व्हिडिओ बॉम्ब फुटल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला. या व्हिडिओ महेंद्र दळवी हे दिसत असल्यानं शिंदे गटाच्या आमदाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. त्यावर महेंद्र थोरवे यांनी दानवेंना हा व्हिडिओ रायगडच्या एका बड्या नेत्याने दिला असल्याचा आरोप केला.

Sunil Tatkare Mahendra Thorve
Maharashtra Politics | शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भूसे आपआपसात भिडले, नेमकं काय घडलं?

चौकशीची केली मागणी

दरम्यान, संशयाची सुई राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी हे कॅश व्हिडिओचे प्रकरण गंभीर असून त्याची सर्व तपास यंत्रणांकडून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. त्यांनी अगदी NIA कडून देखील तपास करा असं सांगतानाच आरोप करणाऱ्या महेंद्र थोरवेंवर उपरोधिक टोलेबाजी देखील केली.

Sunil Tatkare Mahendra Thorve
ambadas danve MLA cash video: हे आमदार कोण जनतेला जरा सांगा... अंबादास दानवेंकडून 'कॅश बॉम्ब'! 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा

थोरवेंचे नाव न घेता काढले चिमटे

सुनिल तटकरे म्हणाले की, 'या प्रकरणाची देशभरातल्या सगळ्या अगदी NIA या तपास यंत्रणेकडून देखील तपास केला पाहिजे. कारण इतक्या मोठ्या व्यक्तीनं (महेंद्र थोरवे) सांगितलं आहे त्यामुळं ताबडोब चौकशी झाली पाहिजे. त्यांचा जाज्वल्य इतिहास आहे. जयप्रकाश नारायण, मधु दंडवते. एमएम जोशी, गणपतराव देशमुख यांच्या मालिकेतील थोर विचारवंत समाजसेवक असल्यामुळं त्यांच्यावर होणारे आरोप हे देशावरच होणारे आरोप आहेत.'

Sunil Tatkare Mahendra Thorve
चिपळुणातील मैदानासाठी सर्वतोपरी सहकार्य करु: खा. सुनिल तटकरे

आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक

तटकरे यांनी युतीच्या सरकारमध्ये मित्र पक्षांना चांगली वागणूक मिळते असं देखील सांगितलं. ते म्हणाले, 'महाविकास आघाडी. काँग्रेस सोबतच्या आघाडी सरकारमध्ये कशी वागणूक मिळत होती हे राज्य मंत्री म्हणून मी जवळून पाहिलं आहे. आता एनडीएमध्ये सहभागी झाल्यानंतर भारतीय जनतापक्षाकडून विशेष करून केंद्रीय नेतृत्व अमितभाई शहांकडून नेहमी मित्रपक्षांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news