Sunetra Pawar Post | शरद पवार यांच्या 60 वर्षांच्या कारकिर्दीवर सुनेत्रा पवार यांची पोस्ट

पवार एकत्र येणार काय; चर्चेला उधाण
Sunetra Pawar |
Sunetra Pawar Post | शरद पवार यांच्या 60 वर्षांच्या कारकिर्दीवर सुनेत्रा पवार यांची पोस्ट File Photo
Published on
Updated on

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी त्यांचे चुलत सासरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला साठ वर्षे पूर्ण होत असल्याची दखल घेत ते त्याच ऊर्जेने आणि निष्ठेने काम करत असल्याचे गौरवोद्गार काढत शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबात नेमके काय सुरू आहे, दोन राजकीय दिशांना गेलेले पवार कुटुंब आता अजित पवार नसले तरी एक होणार का याबद्दलच्या विचारणा उत्सुकतेत बदलल्या आहेत. त्यातच रविवारी सुनेत्रा पवार यांनी फेसबुकवरून शरद पवार यांना शुभेच्छा देत विलीनीकरणाबद्दल नेमके सुरू काय आहे, ही उत्सुकता वाढवली आहे.

उपमुख्यमंत्री झालेल्या सूनबाईंनी सासर्‍यांबद्दलचा आदर जाहीररीत्या व्यक्त केला त्याची चर्चा आहे. फेसबुकवरून शुभेच्छा देतानाच जुने 60 वर्षांपूर्वीचे छायाचित्रही सोबत जोडले आहे. अधिवेशनापूर्वीच्या विरोधी पक्षांच्या बैठकीला शरद पवार यांच्या गटाचा कोणताही आमदार उपस्थित नव्हता. त्यामुळे नेमके काय सुरू आहे? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत काय? सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लढलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना हे एकत्र येणे मान्य आहे काय? अशा अनेक विषयांवर आता चर्चा सुरू झाली आहे. प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news