Sunetra Pawar Portfolios: सुनेत्रा पवारांकडे राज्य उत्पादन शुल्क खाते, अर्थ- नियोजन खाते कोणाकडे?

Sunetra Pawar Deputy CM: शनिवारी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
Sunetra Pawar
Sunetra PawarPudhari
Published on
Updated on

Sunetra Pawar Portfolios Gets Excise, Sports Ministries

मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर शनिवारी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर सुनेत्रा पवारांना कोणत्या खात्यांची जबाबदारी दिली जाणार हे अखेर स्पष्ट झाले आहे. सुनेत्रा पवारांकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

अजित पवारांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाल्याने राज्याच्या राजकारणाला धक्का बसला. अजित पवारांकडे अर्थ, नियोजन अशी महत्त्वाची खाती होती. शनिवारी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी त्यांच्याकडे कोणत्या खात्यांची जबाबदारी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Sunetra Pawar
Sunetra Pawar DCM | धाराशिवची लेक राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री; सुनेत्राताईंच्‍या रुपाने मराठवाड्याला तिसऱ्यांदा संधी

सुनेत्रा पवारांकडे कोणत्या खात्यांची जबाबदारी?

राज्य उत्पादन शुल्क मंत्रालय

क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय

अल्पसंख्याक विकास- औकाफ मंत्रालय

सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं का नाही दिलं गेलं?

सुनेत्रा पवार यांना प्रशासकीय अनुभव नसून राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी मांडला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना सुनेत्रा पवारांकडे अर्थखात्याची जबाबदारी योग्य नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली. अजित पवारांनी अर्थसंकल्पाची तयारी पूर्ण केली असली तरी त्यात काही बदल सुचवायचे असल्यास सुनेत्रा पवारांसाठी अडचणीचं गेलं असते. राष्ट्रवादीच्या नेत्यांशी समन्वय राखत सध्या अर्थ- नियोजन खाते मुख्यमंत्र्यांकडेच ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अर्थसंकल्पानंतर अर्थ व नियोजन खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच दिले जाणार आहे.

Sunetra Pawar
Sunetra Pawar: गृहिणी ते उपमुख्यमंत्री; अजितदादांसारख्याच सुनेत्रा पवारही उत्तम प्रशासक

शपथविधीनंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे, अशी पोस्ट सुनेत्रा पवारांनी टाकली आहे.

पार्थ पवार शपथविधीला का अनुपस्थित होते?

पवार कुटुंबियांच्या विनंतीमुळे पार्थ पवार हे बारामतीत थांबले होते, अशी माहिती समोर आली आहे. कौटुंबिक कारण आणि विधींमुळे शरद पवारांनी पार्थ पवारांना थांबायला सांगितले होते, अशी माहितीही समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news