Gungi Gudiya Controversy| ‘गुंगी गुडिया’ हा अपशब्द किंवा शिवी नाही: सपकाळ

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही ‘गुंगी गुडिया’ असे संबोधले गेले होते.
Harshvardhan Sapkal
Harshvardhan SapkalPudhari Photo
Published on
Updated on

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून अलीकडेच केलेल्या दौऱ्यात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. त्याबाबत काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर सुनेत्रा पवार यांचा ‘गुंगी गुडिया’ उल्लेख करण्यात आल्याने सुनेत्रा पवार गट आणि काँग्रेस यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे.

सुनेत्रा पवार यांना पत्रकारांनी राजकीय प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. पण त्यांनी या प्रश्नांना कोणतेही उत्तर न देता त्या निघून गेल्या. याबाबत काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर सुनेत्रा पवार, अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील, असा उल्लेख केला आहे.

Harshvardhan Sapkal
Pre Marital Investigation: लग्नाआधी गुप्त चौकशीचा ट्रेंड वाढला; फसवणूक टाळण्यासाठी खासगी गुप्तहेरांची मदत

यावर, काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असा उल्लेख करून महिलांबद्दल त्यांना किती द्वेष आहे हे दाखवून दिले आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असून त्या आपले श्रेष्ठत्व सिद्ध करतील, असे उत्तर धनंजय मुंडे यांनी दिले.

काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ‘गुंगी गुडिया’ शब्द वापरला तो काही अपशब्द नाही, शिवी नाही, असंसदीय शब्द नाही. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही ‘गुंगी गुडिया’ असे संबोधले गेले होते.

पण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून आपले कणखर नेतृत्व सिद्ध केल्याने अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना दुर्गा म्हटले. सुनेत्रा पवार यांनीही आपल्या कर्तृत्वातून दुर्गा असल्याचे दाखवून द्यावे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

Harshvardhan Sapkal
Cluster Scheme: नवी मुंबईच्या क्लस्टर योजनेवरून महायुतीत खडाजंगी; शिवसेना-भाजप आमनेसामने

सुनेत्रा पवार या कोणत्याच विषयावर बोलत नाहीत, अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्याच्या चौकशीवर त्या बोलत नाहीत, गुन्हा दाखल झाला नाही. त्यावर त्या बोलत नाहीत, त्यांच्याकडील अर्थखाते भाजपने काढून घेतले. त्याबद्दल त्या बोलत नाहीत. भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या अधिकारावर गदा आणत आहे, त्यावर त्या बोलत नाहीत, असे सपकाळ म्हणाले.

काँग्रेस कार्यालयावर राष्ट्रवादीचे आंदोलन…

सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख केल्याच्या निषेधार्थ अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या टिळक भवन या कार्यालयावर आंदोलन केले. यामागे भारतीय जनता पक्ष व पोलिसांची फूस होती, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news