BMC Election 2026: ठाकरे गटाच्या उमेदवाराची रहिवाशांना दमदाटी...? Video होतोय व्हायरल

रहिवाशांनी काही नागरी समस्यांबाबत विचारणा केली असता उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचा पारा चढला.
BMC Election 2026
BMC Election 2026pudhari photo
Published on
Updated on

BMC Election 2026 Sunanda Lokre Campaign Controversy: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) प्रचाराचा धुरळा उडू लागला असतानाच, मानखुर्दमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मानखुर्द मधील वॉर्ड क्रमांक १४२ मध्ये शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार सुनंदा लोकरे आणि स्थानिक रहिवाशांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रचारादरम्यान लोकरे यांनी रहिवाशांना दमदाटी केल्याचा आरोप होत असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

BMC Election 2026
Union Budget 2026: केंद्रीय अर्थ संकल्प रविवारी सादर होणार; शेअर मार्केटही खुलं राहणार?

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सुनंदा लोकरे आपल्या कार्यकर्त्यांसह वॉर्ड क्रमांक १४२ मध्ये घरोघरी जाऊन प्रचार करत होत्या. यावेळी एका गल्लीत काही स्थानिक महिला आणि पुरुषांशी चर्चा करत असताना अचानक वाद उद्भवला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रहिवाशांनी काही नागरी समस्यांबाबत विचारणा केली असता उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचा पारा चढला.

BMC Election 2026
Viral post : बांधकामांच्या ठिकाणी दिसणारी ती 'गूढ' महिला कोण? सोशल मीडियाने सोडवले कर्नाटकातील 'कोडे'!

व्हिडिओमध्ये काय दिसतंय?

व्हायरल झालेल्या दृश्यांमध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार ओरडाओरड सुरू असल्याचे दिसते. स्थानिक रहिवासी "ही कसली दादागिरी?" असा सवाल विचारताना दिसत आहेत. त्यावर सुनंदा लोकरे संतापून "कोण आहे भाई? कोण दादागिरी करतंय?" असे म्हणत प्रतिवाद करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये स्थानिक महिला आणि उमेदवार यांच्यात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शाब्दिक युद्ध झाल्याचे स्पष्ट होत आहे. "तू आमच्याशी अशी कशी बोलू शकतेस?" असा संताप रहिवासी व्यक्त करत आहेत.

BMC Election 2026
BMC Election 2026: भाजपनं छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेबांच्या पुतळ्यांसमोर बायका नाचवल्या.... शिवसेनेने केला Video शेअर

राजकीय वळण

निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारानेच मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप झाल्याने ठाकरे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्यास सुरुवात केली असून, "सत्ता हातात येण्याआधीच ही अवस्था असेल तर नंतर काय?" असा सवाल विचारला जात आहे. दरम्यान, या वादावर सुनंदा लोकरे किंवा त्यांच्या पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. या प्रकारामुळे मानखुर्द परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news